Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलिसांच्या नशिबी दगड अन शिव्या; सन्मानाने मिळते बळ : जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर पाटील

team by team
March 26, 2022
in क्राईम
0
पोलिसांच्या नशिबी दगड अन शिव्या; सन्मानाने मिळते बळ : जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी
पोलिसांचे अर्धे आयुष्य त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप, तक्रारी,चौकश्यामध्येच जाते. पोलिसांच्या नशिबी फक्त शिव्या अन दगडच आहेत परंतु, चांगल्या कामाची पावती म्हणून सन्मानामुळे कार्यास बळ मिळते असा आशावाद जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील धानोरा गावातील व्यापाऱ्याच्या गोदामातून १०४ अजवानचे पोते चोरुन नेल्याची घटना घडली होती. त्या घटनेमुळे व्यापा-यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुठल्याही प्रकारचे पुरावे नसतांना उपनगर पोलिस ठाणे व एलसीबीच्या पोलिसांनी पथकांनी आपल्या अनुभव कौशल्याचा जोरावर आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केला म्हणून नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे,स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर,तालुका पोलीस निरीक्षक राहुल पवार, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्तावना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष परवेज खान यांनी केली.यावेळी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचार्‍यांच्या पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, पोलिसांवर त्यांच्या आयुष्यात कधीही स्तुतीसुमने उधळली जात नाहीत. नेहमी त्यांच्याविरोधात चौकशी,अर्ज फाटे व तक्रारीने नकारात्मकता वाट्याला येते. परंतु,अशा परिस्थितीत सत्कारात सन्मानाचे चार शब्द ऐकायला मिळाले तर कार्याला बळ मिळते.जिल्ह्यातील कारवायांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे. पोलिसांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी जि.प माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, सरपंच मनोज पाडवी, माजी जि.प सदस्य तानाजी वसावे,बालसिंग चौधरी,डॉ. अजय श्रीवास्तव,डॉ.सी.एस पाटील, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष छोटू चौधरी,सचिव रमेश पाटील, खजिनदार धनेश सेवलानी, सल्लागार चेतन चौधरी,रोशन वसावे,नितीन चौधरी,भूषण पाटील,जयेश चौधरी,सुनील पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जि.प समाज कल्याण विभागाच्या ५ टक्के सेस निधीतून अपंगांना माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते झेरॉक्स मशीनचे वाटप

Next Post

नवीदिल्ली येथे खा.डॉ.हीना गावित यांना मान्यवरांच्या हस्ते सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान

Next Post
नवीदिल्ली येथे खा.डॉ.हीना गावित यांना मान्यवरांच्या हस्ते सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान

नवीदिल्ली येथे खा.डॉ.हीना गावित यांना मान्यवरांच्या हस्ते सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add