Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अतिदुर्गम भागात आठवीच्या विद्यार्थ्याने सुचविला ड्रोन ॲम्बूलन्सचा पर्याय, बालविज्ञान परिषदेत श्रीराम क्लासच्या प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावर

Mahesh Patil by Mahesh Patil
March 25, 2022
in सामाजिक
0
अतिदुर्गम भागात आठवीच्या विद्यार्थ्याने सुचविला ड्रोन ॲम्बूलन्सचा पर्याय, बालविज्ञान परिषदेत श्रीराम क्लासच्या प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावर

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा अतिदुर्गम भागात वसला असून धडगाव, अक्कलकुवा परिसरातील काही गावांमध्ये रस्त्यांअभावी येथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. येथे आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नसल्याने बोजवारा उडतो. यामुळे बांबुलन्स, रोड ॲम्बूलन्स, फ्लोटींग ॲम्बूलन्स, बाईक ॲम्बूलन्स या भागात फारशा प्रभावी ठरत नसल्याने यावर नंदुरबार शहरातील प्रणव वडाळकर या आठवीच्या विद्यार्थ्याने ड्रोन ॲम्बूलन्सचा पर्याय सुचविला आहे. सदर प्रकल्पाचे बालविज्ञान परिषदेत राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्यात आले.


विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा वृत्तीला चालना मिळावी यासाठी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या माध्यमातून प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यात वात्सल्य सेवा समितीच्या माध्यमातून सदर परिषदेचेे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी जिल्हास्तरावर सुमारे १६४ प्रकल्पांचे नोेंदणी करण्यात आली होती. त्यातील ६४ प्रकल्पांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. तर यातील १६ प्रकल्प विभाग स्तरावर निवडले गेले होते. त्यातील चार प्रकल्प राज्यस्तरावर व चौघांमधील ड्रोन ॲम्बूलन्सवरील प्रकल्पाचे राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण झाल्याची माहिती जिल्हा समन्वयक आशिष वाणी यांनी दिली. नंदुरबार येथील श्रीराम कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी प्रणव आशुतोष वडाळकर याने मार्गदर्शक शिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्पाचे सादरीकरण केल्याचे श्री.वाणी यांनी सांगितले. मानव निर्देशांकांत नंदुरबार जिल्हा विकासाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. त्यामुळे जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. असे असतांना जिल्हा निर्मितीच्या २४ वर्षानंतरही अतिदुर्गम भागातील शेकडो पाड्यांपर्यंत रस्ते न पोहचल्याने येथील हजारो रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात प्रामुख्याने तोकड्या आरोग्य व्यवस्थेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्यांअभावी या भागात ॲम्बूलन्स पोहचू शकत नाही. यामुळे अनेकदा रुग्णांचा रस्त्यातच मृत्यू होतो. गरोदर माता, सर्पदंश झालेले रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या भागात ग्राऊंड ॲम्बूलन्स सोयीची असल्या तरी तिच्या उपयोगितेवर मर्यादा येतात. फ्लोटींग ॲम्बूलन्स या नदी किनाऱ्यालगतच्या गावांपुरत्याच मर्यादीत राहिल्या आहेत. तर आता गेल्या दीड वर्षापूर्वी बाईक ॲम्बूलन्स आल्या असल्या तरी ज्या भागात रस्तेच नाहीत तेथे बाईक ॲम्बूलन्स जाऊ शकत नाही यावर सोलर पॉवर्ड ड्रोन ॲम्बूलन्सचा पर्याय उपयोगी ठरु शकतो असे इयत्ता आठवीमधील प्रणव वडाळकर या विद्यार्थ्याने भारत सरकारद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत प्रकल्प सादरीकरण केले. यामुळे सदर प्रकल्पाची गांभीर्याने दखल घेवून नेमक्या या भागात ड्रोन ॲम्बूलन्सची उपयोगिता पडताळणी करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

सोलर पॉवर्ड ड्रोन ॲम्बूलन्स बहुपयोगी
सोलर पॉवर्ड ड्रोन ॲम्बूलन्स रुग्णांना आरोग्यसेवा गतिमान करण्यासाठीच नव्हे तर ड्रोनच्या माध्यमातून रुग्णांना औषधी पोहचविणे, ड्रोनच्या माध्यमातून पीक फवारणी, त्यात कॅमेरा असल्याने वन्य क्षेत्रातील पशूंवर लक्ष, रुग्णांना वेळेवर रुग्णालयापर्यंत पोहचविणे, पुर परिस्थिती, अतिवृष्टी आदी भागांची पाहणी तात्काळ करणे आदी ठिकाणी उपयोगी ठरु शकते.

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सातत्याने रुग्णसेवा वेळेवर न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत असल्याने नेहमीच ऐकिवात येते यामुळे यावर काय करता येईल? असा विचार मनात आल्यानंतर या भागात ड्रोन ॲम्बूलन्सचा पर्याय प्रभावी ठरु शकतो असे वाटले. यातून मॉडेल बनवून प्रकल्प सादर केला होता. सदर प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर झाला आहे.
-प्रणव वडाळकर (बाल वैज्ञानिक)

बालविज्ञान परिषदेचे नंदुरबार जिल्हा पातळीवर वात्सल्य सेवा समिती आयोजन करते. यात विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वृत्तीला वाव मिळावा हा हेतू आहे. दरवर्षी विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येते. विद्यार्थी स्थानिक पातळीवरील समस्येचा शोध घेवून त्यावर स्वत:च अभ्यास करुन उपाय सुचवत प्रकल्प सादर करतात.
-आशिष वाणी (जिल्हा समन्वयक)

बातमी शेअर करा
Previous Post

ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे धुळे चौफुलीवर पाणपोईचे उद्घाटन

Next Post

महावितरणने नवापूर पालिकेचे वीज कनेक्शन केले खंडीत तर नगरपालिकेने महावितरणचे कार्यालय केले सिल

Next Post
महावितरणने नवापूर पालिकेचे वीज कनेक्शन केले खंडीत तर नगरपालिकेने महावितरणचे कार्यालय केले सिल

महावितरणने नवापूर पालिकेचे वीज कनेक्शन केले खंडीत तर नगरपालिकेने महावितरणचे कार्यालय केले सिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group