नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे बांधकाम ठेकेदाराचे ८४ लाखाचे बिलपास करण्यासाठी ४३ लाखाच्या लाचेची मागणी करीत ४ लाखाची लाच स्वीकारताना पंचायत समितीचे बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता व एका खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आज अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त व नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. तक्रारदार यांना जिल्हा परीषद अंतर्गत अक्कलकुवा उपविभाग मार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची नवीन ईमारत बांधणे , रस्ता सुधारणा , रस्ता जलनिस्सारणाची कामे व ईतर 45 कामांचे कार्यारंभ आदेश मिळाले होते. व नमुद सर्व कामे तक्रारदार यांनी पुर्ण केली आहेत. सदर कामांबाबत आलोसे यांनी तक्रारदार यांचे एकूण ८ कोटी ४५ लाख ८९ हजार रुपये अंतिम देयके मान्य केली असुन यापैकी एकुण ७ कोटी ६१ लाख ७९ हजार रुपये एवढी रक्कम तक्रारदार यांना प्राप्त झाली आहे. तसेच एकुण मान्य रकमेपैकी ऊर्वरीत 84 लाख एवढी रक्कम
उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता
यांनी राखून ठेऊन तक्रारदार यांना मुद्दामहुन अनामत रक्कम राखुन ठेवली असे सांगीतले. सदरची 84 लाख रुपये ऊर्वरीत रक्कम मिळणेकामी तक्रारदार यांनी वेळोवेळी जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालय अक्कलकुवा येथे उप अभियंता सुनील पिंगळे व सहाय्यक अभियंता एस.बी.हिरे यांना भेटून ऊर्वरीत देयकाची रक्कम मिळणे कामी विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी या आधी अदा केलेल्या देयकांबाबत च्या रकमेच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून उप अभियंता सुनील पिंगळे यांनी ३० लाख ५० हजार रुपये व शाखा अभियंता एसबी हिरे यांनी १३ लाख २५ हजार रुपयांची अशी एकुण ४३ लाख ७५ हजार रुपये एवढ्या रकमेची मागणी केली. तसेच मागणी केलेले पैसे दिले नाही तर तुमचे उर्वरित देयके तुम्हाला भेटू देणार नाही असे सांगीतले. तसेच तक्रारदार यांनी उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता यांना वरील नमुद रक्कम द्यावी याची हमी म्हणुन तक्रारदार यांच्याकडुन उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता यांनी जळगाव जनता सहकारी बँक शाखा नंदुरबार या बँकेचे 30 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश व १३ लाख 25 हजार रुपयांचा धनादेश असे दोन धनादेश दिनेश यादवराव सोनवणे या उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्या ओळखीच्या इसमाच्या नावाने लाचे पोटी लिहून घेऊन त्यांचे ताब्यात ठेवले व रोख रक्कम आणून दिल्यानंतर सदरचे दोन्ही धनादेश परत करून देऊ असे सांगितले होते. सुनील दिगंबर पिंगळे जि.प.बांधकाम उप अभियंता वर्ग -1, एस. बी. हिरे जि.प. बांधकाम सहाय्यक अभियंता वर्ग -2 दोन्ही नेमणुक जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालय अक्कलकुवा , तालुका अक्कलकुवा, जि. नंदूरबार यांनी तक्रारदार यांच्याकडून 43 लाख 75 हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती प्रथम हप्ता टोकन रक्कम 4 लाख रुपये आज दि.23 मार्च रोजी पंच साक्षीदारांसमोर लाचेची रक्कम स्वीकारली आहे. उपविभागीय अभियंता, सहाय्यक अभियंता यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कार्यवाही ला.प्र.वि.चे पोलीस उप अधीक्षक, राकेश आ. चौधरी, पोलीस निरीक्षक, समाधान महादू वाघ, पोलीस निरीक्षक, माधवी एस. वाघ, पोह उत्तम महाजन, पोहवा विलास पाटील, पोहवा विजय ठाकरे, पोना अमोल मराठे पोना संदीप नावाडेकर, पोना देवराम गावित, मपोना ज्योती पाटील व चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे.