Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महावितरणच्या कृषी धोरणाचा लाभ घेत जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने १५ लाखांचे वीजबिल भरून मिळवला थकबाकीमुक्तीचा मान

team by team
March 12, 2022
in कृषी
0
महावितरणच्या कृषी धोरणाचा लाभ घेत जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने १५ लाखांचे वीजबिल भरून मिळवला थकबाकीमुक्तीचा मान

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासन व महावितरणने कृषी वीज धोरणात दिलेल्या घसघशीत सवलतीचा लाभ घेत तळोदा तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्याने २० कृषिपंपांचे १५ लाख रुपये वीजबिल कोरे केले आहे.
हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी हे महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी आहेत. तळोद्यासह तालुक्यातील दलेलपूर व प्रतापपूर येथे ते स्वतःच्या शेतीसह इतर काही लोकांची भाड़ेतत्वावर शेती करतात. या शेतीच्या सिंचनासाठी सर्व ठिकाणी एकूण २७ कृषिपंप वापरत आहेत. ते नेहमी महावितरणला सहकार्य करतात, मात्र काही कारणाने या पंपांचे वीजबिल थकित होते.
शासनाने कृषी वीज धोरण आणल्यावर त्यांच्या सर्व संबंधित लोकांची महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी ३ ते ४ वेळा बैठक घेतली. त्यात हाजी निसारअली यांनी योजना समजून घेतली. शनिवारी (१२ मार्च) तळोदा येथे लोकअदालत असल्याने महावितरणने न्यायालय परिसरातच कृषी वीजबिल मेळावा आयोजित केला होता. त्यात ग्राहकांना कृषी धोरणाचे फायदे समजावून सांगण्यात आले. यावेळी वेळी निसार अली मक्राणी हेदेखील उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या सर्व शंका विचारल्या, सविस्तर चर्चा केली आणि त्यांना सर्व माहिती दिली. त्यांनी मी आज दुपारी बिल भरतो, असे आश्वासन दिले व दुपारी कार्यलयात येऊन एकूण २० वीजबिलांची थकबाक़ी १५ लाख २३ हजार ७० रुपये रोख व धनादेशाद्वारे भरली आणि ते थकबाकीमुक्त झाले.
महावितरणच्या वतीने उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील यांनी निसारअली यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सहायक अभियंता चेतन पाचपांडे, कनिष्ठ अभियंता विलास गुरव उपस्थित होते. उर्वरित पंपांच्या बिलांची ७ लाखांची थकबाकी २५ तारखेपर्यंत भरण्याचे तसेच इतर ठिकाणीही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्याचे आश्वासन निसारअली यांनी दिले. या वसुलीसाठी अभियंत्यांसह तंत्रज्ञ बी एन. राजपूत, ए.एच. कलाल, आनंदसिंग गिरासे यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

रायसिंगपुऱ्यात विकासकामाचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे जि.प.अध्यक्षा ॲड. सिमा वळवी यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post
‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे जि.प.अध्यक्षा ॲड. सिमा वळवी यांच्या हस्ते प्रकाशन

'दुष्टचक्र' कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे जि.प.अध्यक्षा ॲड. सिमा वळवी यांच्या हस्ते प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add