नंदुरबार l प्रतिनिधी
राजपूत समाज बांधवांनी अनिष्ट रूढी परंपरागत चालत आलेल्या साखरपुड्या कार्यक्रमाला फाटा देत सरळ लग्नच उरकून टाकलेल्या कुंटुंबियांचा श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे सत्कार करीत अभिनव प्रयोग राबविला आहे.
श्री. क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे राजपूत समाज बांधवांनी अनिष्ट रूढी परंपरागत चालत आलेल्या साखरपुड्या कार्यक्रमाला फाटा देत सरळ लग्नच उरकून टाकलेल्या नंदुरबार शहरातील राजेश पदमसिंग राजपूत, उदेसिंह राजाराम राजपूत, शेखर भिका राजपूत, चंद्रकांत जानकीराम राजपूत तसेच टोकरतळे येथील लक्षण रामदास राजपूत,राजेंद्र मोहन राजपूत, बालसिंह राजपूत, या समाज बांधवांचा सहपत्नीक पुष्पगुच्छा सह सन्मान पत्र देवून सेवा समितीचे कार्यध्यक्ष मोहीतसिंह राजपूत, उपाध्यक्ष पवनसिंह राजपूत, सचिव जितेंद्रसिंह राजपूत, खजिनदार दीपकसिंह राजपूत, संचालक हेमंतसिंह जयसिंह राजपूत, पंकजसिंह राजपूत, सुमानसिंह राजपूत,रत्नदिपसिंह राजपूत,अजयसिंग राजपूत, दिपकसिंह(राणा) राजपूत, शरदसिंह राजपूत,धमेंद्रसिंह राजपूत,नितीनसिंह राजपूत,या पदाधिकारी व संचालक मंडळाच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
क्षत्रिय समाज सेवा समिती सदैव समाजाचा सुखा,दुःखात धावून जाण्यासाठी तत्पर असते व सेवा समीती तर्फे दर वर्षीअसे एक नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रम घेत असते म्हणून समाजा बांधवांन तर्फे सेवा समितीचे कौतुक होत असते.