म्हसावद l प्रतिनिधी
येथील सर सैय्यद उर्दू स्कूल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बिल्किस हासमानी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विकार शेख, निरीक्षक प्रा ज्ञानी कुलकर्णी, पर्यवेक्षक इत्तेखार सैय्यद, अतहरअली अली सैय्यद, हिना खाटिक, नाजनीन शाह रहुफअन्सारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.उपस्थित शिक्षकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.