म्हसावद l प्रतिनिधी
‘महिला आपल्या हक्का बरोबर कर्तुत्वाला प्राधान्य देत आहेत.म्हणून त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.याची दखल सन्मित्र क्रीडा मंडळाने घेतली आहे.खरोखरच चांगला उपक्रम आहे.’ असे प्रतिपादन माजी शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.सदस्या जयश्री पाटील यांनी सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे येथील कृषी भवनात आयोजित नारी शक्ती प्रेरणा पुरस्कार प्रदान समारंभात केले. मान्यवरांचे हस्ते सरस्वती, जिजाऊ,सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या कार्याची, मेहनतीची पावती म्हणजे शाबासकीची पावती. त्यासाठी अशा कर्तृत्ववान व सेवाव्रती महिलांचा आनंद वाढावा म्हणून पण सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे शहादा शहरातील निवडक 18 महिलांचा सन्मान चिन्हं, भेटवस्तू आणि नॅपकिन, गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार महिला दिनी केला. कोरोनाच्या महामारीच्या काळात देखील या सेवाव्रती महिलांनी आपली सेवा चालू ठेवून समाजसेवा केली व आपल्या कुटुंबाला हातभार लावून आणि कुटुंबातील व्यक्तींना सर्व प्रकारचे सहकार्य केले. अशा कर्तृत्ववान व सेवाव्रती महिलांचा सत्कार –
जयश्रीबेन दिपक पाटील. (जि.प.सदस्या), कल्पना अशोक पाटील (उपसरपंच) साधना छोटूलाल पाटील, भावना प्रमोद चौधरी, श्रद्धा विनोद चौधरी,
भावना भरत शर्मा (आदर्श शिक्षिका) यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, सचिव प्रा. संपत कोठारी,समीर जैन, प्रतिमा माळी, प्रतिमा बोरसे, ताराबाई बेलदार, शोभना वैद्य,सुनिता पाटील, ललिता राठोड, बिलकीस हासमानी, माया जोहरी, रमेश महाले, प्रकाश शेळके, हनीफ कासमाणी, उमर पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी केले. शोभना वैद्य,
अश्विनी जोशी, कल्पना निकुंभ या सत्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रतिभा बोरसे यांनी केले. आभार प्रदर्शन संपत कोठारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समीर जैन, शिवपाल जांगिड, सुरेश चव्हाण,पिनाकिन पटेल, के. के. सोनार,प्रशांत कदम,राजेंद्र महाजन, यांनी सहकार्य केले.
पुरस्कार प्राप्त महिलांची नावे- मिराबाई प्रेमचंद भावसार, अश्विनी राजेंद्र जोशी, वंदना चंद्रशेखर पाटील, उषाबाई किसन अहिरे, विद्या पावरा, गंगाबाई शांतीलाल डामरे, अलका संदीप विसपुते, रंजनाबाई शाम कुमावत, तबस्सुमबी अशपाक पठाण, लिलाबाई श्यामराव बोरसे, उज्वला डेव्हिड राऊत, कविता निकुंबे, नसरीनबी शेख ईसराईल,सुवर्णा महेंद्र तांबोळी, लताबाई पंडित अहिरे.