नंदुरबार l प्रतिनिधी
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे विविध मागण्यांसाठी आज विसरवाडी ते नंदुरबार पायी बिढार मोर्चा काढण्यात आला.नवापूर तालुक्यातील बिज्यादेवी येथे मोर्चाचा मुक्काम असुन अद्या दि.१० मार्च रोजी तो जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे धडकणार आहे.या मोर्चात ५ हजारावर आंदोलक आहेत.
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे आज विसरवाडी ते नंदुरबार पायी बिढार मोर्चा काल भर उन्हात निघाला यावेळी त्यानी निवेदनात म्हटले आहे कि, आदिवासीची हक्काच्या जमिनीचा सातबारा उतारा द्या,नवापूर तालुक्यातील प्रस्तावीत एम.आय.डि.सी भूअधिग्रहण ताबडतोब थांबवा,वनखाते बेकायदेशीर पणे आदिवासीनवर खोट्या केसेस करत आहेत ताबडतोब थांबूवन संबंधित अधिकार्यांवर फोजदारी गुन्हा दाखल करा, मंजूर वनपट्टा धारक शेतकर्याना वीज कनेक्शन, बँक कर्ज, सह सर्व योजनेचा लाभ द्या, आदिवासी ना दिलेल्या प्रमापत्रात अनेक त्रूटया आहेत उदा. कम्प न. चुकीचा, क्षेत्र कमी, नाव चुकीचं, नावे समाविष्ट करणे ती चुकीची प्रमाणपत्रे ताबडतोब दुरुस्ती करा, कोरोना काळात उपविभागीय व जिल्हास्तरिय समितीने वनखात्याच्या चुकीचा अभिप्राय व चुकीच्या सल्ल्या नुसार २००५ पूर्वीच्या वनजमीन कसत असलेल्या वनहक्क दावेदाराना नोटीसा काढत आदिवासीना जमिनीतून बेदखल करण्याचा कट रचला जात आहें त्या चुकीच्या नोटीसा परत घ्या व आदिवासीना सातबारा उतारा द्या,देशव्यापी सर्व पिकासाठी हमीभाव गॅरंटी कायदा करा,आदिवासीना वनवासी म्हणार्यांवर कारवाई करा, महामानवाची बदनामी करणार्या राज्यपालचा निषेध, बोगस आदिवासीना विरोध,आदिवासींचे पाणी, रेशन, शिक्षण, आरक्षण, यासह अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा निघाला आहे. गेल्या ३ महिन्यात अनेकदा निवेदने देऊन चर्चा करण्यासाठी वेळ मागितली परंतु जिल्हा अधिकारी यांनी मला वेळ नाही आदिवासीना भेटण्यासाठी म्हणत नकार दिला त्या मुळे शेवटी प्रशासनाच्या असंवेदनशिलतेच्या निषेर्धात जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या वतीने कॉम्रेड.रामशिंग गावीत, किशोर ढमाले, होमाबाई गावीत, लिलाताई वळवी, शीतल गावीत गेवाबाई गावीत,आर टी गावीत, रणजित गावीत दिलीप गावीत, जगन गावीत, शिंगा वळवी, विक्रम गावित यांच्या नेर्तृत्वाखाली हजारो आदिवासीचा मोर्चा निघाला आहे. पायी चालत खांडबारा मार्गे बिज्यादेवी या ठिकाणी विश्रांती व मुकाम करून सकाळी परत नंदुरबार च्या दिशेने दुपार पर्यत नंदुरबार शहरात मोर्चा दाखल होईल , शहरात रॅली काढत सुभाष चौकात सभा घेऊन मोर्चा कलेक्टर कचेरीवर धडकेल .जिल्हाधिकार्यांनीमोर्च्याकरांच्या मागण्या वर समाधानक्कारक चर्चा केली तर ठीक नाही तर मुबंईच्या दिशेने आगेकूच करण्याच्या तयारीने मोर्चेकरी निघाले आहेत अशी प्रतिक्रिया कॉम्रेड रामसिंग गावीत यांनी व्यक्त केली.