नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून जवळच आलेल्या गुजरात नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यातील पांचपिपरी येथिल महिला शेतकरी उषाबेन दिनेशभाई वसावा यांना सेंद्रिय शेतीत योगदान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपती श्री.रामनाथ गोविंद यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे .
जागतिक महिला दीनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा पुरस्कार देऊन गौरव दिल्लीत राष्ट्रपती भवनात विविध मान्यवरांचा उपस्थित समारंभ पार पडला केले . गुजरात राज्यातील नर्मदा जिल्हयातील सागबारा तालुक्यातील पांच पिपरी येथिल महिला शेतकरी उषाबेन दिनेशभाई वसावा यांनी सेंद्रिय शेतीतील योगदान दिलेबद्दल व गुजरात मधील समाजसेविका म्हणून 500 महिलांना जमिनीचा हक्क मिळवून दिला आहे . गाव परिसरातील महिला शेतकऱ्यांना खत वापर आणि तंत्रज्ञानावर आधारित शेती प्रशिक्षण देते . सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करीत सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल उषाबेन दिनेशभाई वसावा यांनी नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे . सर्वत्र अभिनंदन होत आहे .
उषाबेन दिनेशभाई वसावा यांना नारी शक्ती पुरस्कार पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र सोशल मीडियावर त्यांची माहिती व फोटो झळकत असून नंदूरबार जिल्ह्यातील नागरिक उत्स्पूर्त पणे शुभेच्छा देत आहेत.