नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस (सचिव) पदी जि. प.सदस्य मधुकर सुरुपसिंग नाईक यांची निवड झाली.
असून लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत त्यांनी 13 हजार 666 मतांनी विजय संपादन केला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार युवकांच्या संघटनासाठी लोकशाही पद्धतीने युवक काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली वुइथ इंडियन युथ काँग्रेस या मोबाईल ॲप द्वारे ऑनलाइन मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस (सचिव) पदी जि. प.सदस्य मधुकर सुरुपसिंग नाईक यांची निवड झाली.असून लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत त्यांनी 13 हजार 666 मतांनी विजय संपादन केला.
त्यांच्या निवडी नंतर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.