नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातून चोरीला गेलेले दोन मोबाईल
२४ तासाच्या आत आरोपीसह शोध घेण्यात नंदुरबार शहर पोलीसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.५ रोजी रात्री ११ वा . ते दि . ६ मार्च रोजीचे पहाटे ६ वा . चे दरम्यान यातील फिर्यादी द्वारकादास उरनसिंग पटेल रा . शंकर अपार्टमेंट सोमश्वरनगर , सुरत ( गुजरात ) ह.मु. विरल विहार प्लॉट न . २३ , नंदुरबार यांचे राजकुमार पाटील यांचे दवाखान्या शेजारी घर बांधकामाचे काम चालू असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने २० हजाराचे दोन मोबाईल लंपास केल्याची नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व गुन्हे शोध पथकाने तपासाचे चक्र फिरवुन सदरचे मोबाईल हे धडगाव येथील जितेंद्र सायसिंग पावरा याने चोरल्याचे समजल्याने सदर आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून गुन्हयासंबंधी विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . सदरचा गुन्हा २४ तासाच्या आत उघडकीस आणुन संशयित आरोपी जितेंद्र सायसिंग पावरा रा , धडगाव याचेकडुन २ मोबाईल जप्त करण्यात आले असुन आरोपीस सदर गुन्हयात अटक केली आहे . सदरची कारवाई पोलीस अधिक्षक शपी . आर . पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हीरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोउपनि मुकेश पवार , पोहेकॉ अतुल बिहाडे , पोना बलविंद्र ईशी , पोकॉ विजय नागोडे , पोकॉ राहुल पांढारकर , पोकॉ इमाण खाटीक यांनी केली आहे .