नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागामार्फत न्यूक्लिअस बजेट योजना सन 2021-2022 अंतर्गत अनुसूचित जमातीच्या युवक -युवतींना संगणक टंकलेखन प्रशिक्षण देणे तसेच युवतींना ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या युवक- युवतींकडून 14 मार्च 2021 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी व बारावी गुणपत्रकांची झेरॉक्स प्रत तसेच अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.