शहादा ! प्रतिनिधी
कोरोना नियमांचे पालन करत प्रमूख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम करण्यात येईल. असे आदिवासी एकता परीषदेचे संस्थापक आणि जेष्ठ विद्रोही कवी वाहरू सोनवणे यांनी शहादा बैठकीत आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जाहिर केले.
शहादा येथे दि. ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिवस साजरी करण्याविषयी आदिवासी एकता परिषदेच्या नियोजनाने बैठक झाली. बैठकीत शहादा तालुक्यात सर्व आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते, अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.
संयुक्त संघाद्वारे जाहिर झालेला दि.९ ऑगष्ट हा दिवस १९९३-९४ पासुन जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारत देश देखिल संयुक्त राष्ट्र संघटनेचे सहभागी देश आहे. आणि विश्व आदिवासी दिवस साजरी करण्याविषयीच्या संमतीवर भारत सरकारही राजीमंजूर आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय पातळीवर दि.९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिवस साजरी केला जात नाही याची खंत आदिवासी समाजाला आजही वाटत असते. जागतिक आदिवासी दिवास हा आदिवासींचा हक्काचा दिवस, अस्मिता , अस्तित्व आत्मसन्मान जपण्याचा दिवस. आदिवासींचे विविध प्रश्न समजुन घेण्याचा दिवस पण दरवर्षी हा हक्काचा दिवस साजरी करण्यासाठी देखिल अधिकार्यांची परवानगी घ्यावे लागते. हा व्यवहार युनो ने आदिवासीला दिलेल्या अधिकाराला धरुन नाही. आदिवासी हा निसर्ग जनत संवर्धन करनारा समाज आहे. आदिवासी संस्कृतीत निसर्ग नियम आहे. मानवी जीवन मुल्य आहेत. मानवी मुल्य, आणि निसर्ग जतन संवर्धन करण्यासाठी जगातील प्रत्येकाने पुढे आले पाहिजे.आदिवासीयत जपली पाहिजे. बैठकीत असे मुद्देसूद चर्चा जेष्ठ कार्यकर्त्यांनी मांडले.
या बैठकीत शहादा तालुक्यातील विविध आदिवासी संघटनेचे प्रमूख प्रतिनिधि उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यकार, विचारवंत वाहरू सोनवणे होते. बैठकीचे प्रस्थाविक आदिवासी एकता परिषद तालुका संतोष पावरा यांनी मांडले तसेच इंजि.जेलसिंग पावरा , चंद्रसिंग बर्डे, वनिताताई पटले, जगदीश पवार, सुरजित ठाकरे, दिपक ठाकरे, रवीद्र चौव्हाण, करण तडवी, योगेश पावरा, संतोष माळी, मगरे योगेश, रवी ठाकरे, सुनिल सुळे, आकाश मोर, विश्वजित ठाकरे, नसीब वळवी, गणेश ठाकरे आदी अनेकांनी सुयोग्य कार्यक्रमासाठी आपले मत, विचार मांडले. आणि शेवटी आदिवासी एकता परीषदेचे जिल्हा सचिव अनिल चौव्हाण यांनी सर्वाचे आभार मानले.