नंदुरबार l प्रतिनिधी
शालेय जीवनात अभ्यासाबरोबर शिक्षण क्षेत्राला देखील तितकेच महत्व देणे गरजेचे आहे. कोरोना काळात फिटनेस होती म्हणूनच रोगप्रतिकार क्षमता टिकून होती. शिक्षणाबरोबर शिक्षण क्षेत्रातही उज्वल भविष्य घडते. यासाठी शालेय जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन व नंदुरबार जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्यावतीने दुसर्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे उद्घाटन ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून व बलून सोडून करण्यात आले. या स्पर्धेत भारतातील सात राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम विभागीय रोलबॉलचे सचिव प्रताप पगार, विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्या सुषमा शहा, उपमुख्याध्यापक राजेश शहा, गुजरात सचिव धर्मेश परमार, मध्यप्रदेश सचिव सुर्यदत्त जोशी, रोलर स्पोर्ट्स सोशल ऍकेडमीचे सचिव महेश उभे, छत्रपती रोलबॉलचे अध्यक्ष अर्जुन हटकर, क्रीडा कार्यकर्ते प्रा.डॉ.ईश्वर धामणे, क्रीडाशिक्षक दिनेश बैसाणे, जिल्हा रोलबॉल सचिव नंदू पाटील, बी.डी.जाधव, दिनेश चौरे आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वितेसाठी संयोजन समितीचे भिकू त्रिवेदी, नंदू पाटील, जगदीश पाटील, जगदीश वंजारी, डॉ.मयूर ठाकरे, दिनेश बैसणे, जितेंद्र माळी, राजेश्वर चौधरी, सीमा पाटील, भरत चौधरी, नरेश शहा, जितेंद्र पगारे, रामा हाटकर, बँडपथक हेमंत पाटील, रांगोळी रेखाटन शिवाजी माळी स्वागत गीत अनघा जोशी, फलकलेखन महेंद्र सोमवंशी आदीनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.मयुर ठाकरे सूत्रसंचालन राहुल वडणेरे, जावेद धोबी तर आभार भिकू त्रिवेदी यांनी मानले.








