नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील चांदसैली येथे टेनिस बाॅल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बोरपाणी व आमोदा मध्यप्रदेश या संघामध्ये अंतिम सामना झाला. यात अंतिम विजेतेपद पद आमोदा संघाने पटकविले व उपविजेते बोरपाणी संघाने तर तृतीय विजेते जय बजरंग टीम टाकली मध्यप्रदेश यांनी पटकविले. विजेत्या संघांना जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमा वळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.
कोणताही खेळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असून सध्याच्या धावपळीच्या जीवनात खेळाला आज महत्व आहे, परंतू खेळाला फक्त तेवढ्या पुरताच मर्यादीत न ठेवता आपले करिअर म्हणून ही विकसित करावे असे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जि.प.सदस्य सुहास नाईक, शहादा तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ. सुरेश नाईक, प.स.सदस्य गोपी पावरा, स्वयरोजगार सेलचे प्रदेश सरचिटणीस निलेश सुळे, चांदसैली सरपंच आनंददादा, प्रकल्प स्तरीय समिती सदस्य कालुसिंग भंडारी, प.स.सदस्य रोहिणी पवार, प.स.सदस्य शांतीलाल पाटील, प.स.सदस्य तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सत्येन वळवी, किशोर पाटील, दिनेश पवार, शहादा काॅग्रेस शहर अध्यक्ष चंद्रकांत पाटील, काॅग्रेसचे व्ही.जे.एन.टी. जिल्हा अध्यक्ष गजानन चव्हाण, काॅग्रेसचे जिल्हा यंग ब्रिगेड अध्यक्ष प्रकाश पवार, मा.प.स.सदस्य लगन पावरा, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य नानाभाऊ शिंदे, जि.प.सदस्य सुभाष पटले, आण्णा पटले रमेश पावरा, दिवाण भंडारी, उत्तम पावरा, गणेश पाटील, क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत पटले, हेमंत पटले, जितू मोहिते यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.








