Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धूम स्टाईलने महागड्या व हायस्पीड मोटर सायकली वापरून सुझलॉन टॉवर मध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद

team by team
March 3, 2022
in क्राईम
0
जिल्ह्यातील पवनऊर्जा निर्माण करणारी सुझलॉन व तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज यांच्या बोगस जमीन व्यवहाराचा आवाज  आमदार शिरीष नाईक यांनी विधानसभेत पोहोचला

नंदूरबार l प्रतिनिधी
धूम स्टाईलने महागड्या व हायस्पीड मोटर सायकली वापरून सुझलॉन पवन उर्जा प्रकल्पात टॉवरची वायर चोरणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि . 22 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 8 वा ते दि . 27 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे 3 वा . शनिमांडळ टॉवर सी 33 , के 340 , टॉवर मधील 15 हजार 200 रु कि . 975 मी . केबल वायर कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीचे इरादयाने चोरुन नेलेवरुन राजेश चिंतामन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नंदुबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुद्ध चोरीचा गुन्हा lदाखल करण्यात आला होता . नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्हा उघडकीस आणुन मालमत्ता हस्तगत करणे व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत आदेशीत केले . वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आपल्या बातमीदारांना सक्रीय केले व गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या आरोपीतांचे हालीचालींबाबत माहिती मिळविली . दि. 1 मार्च 2022 रोजी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , चाकळे ता.जि. नंदुरबार येथील सागर पाडवी व त्याचे इतर 5 ते 6 साथीदार यांनी सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरील तांब्याची तार चोरी करुन नंदुरबार शहरातील भंगार खरेदी दुकानदारास विकण्यासाठी आलेले असुन सध्या नंदुरबार शहरात धुळे चौफुली येथे फिरत आहेत . दि. 1 मार्च 2022 रोजी मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ धुळे चौफुली येथे पाठवुन संशयीतास ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे जावुन संशयीतांचा शोध घेतला असता तेथे काही तरुण मोटरसायकलीवर बसलेले दिसले व त्यांचे मोटरसायकलींवर प्लास्टीकच्या गोण्या दिसुन आल्या . त्यांचा संशय आल्याने तपास पथकाने त्यांना जागीच ताब्यात घेऊन त्यांचेकडील प्लास्टीकच्या गोण्या तपासल्या असता त्यात 74.78 कि.ग्रॅ वजनाची 37 हजार 400 रुपये किमंतीची तांबे धातुची वायर मिळुन आली . त्याबाबत त्यांना विचारपुस केली असता त्यांची भंबेरी उडाली . त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे ज्ञानेश्वर वसंत मोरे रा. भवानी चौक शनीमांडळ , न्हानभाऊ भगवान भिल रा . भवानी चौक शनीमांडळ, किरण मंगलसिंग भिल रा . तिलाली भिलाटी शनीमांडळ, लखन बापु भिल रा . शनिमांडळ अर्जुन भिला पवार रा . चाकळे 6 ) सागर शिवनाथ पाडवी रा . चाकळे असे सांगितली . त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे इतर 2 साथिदार विपुल कोळी रा . शनीमांडळ, प्रशांत कोळी रा . रजाळे यांच्यासह शनिमांडळ टॉवर सी 33 , के 340 , टॉवर मध्ये चोरी केली असल्याचे कबुल केले . तसेच 10 ते 15 दिवसांपुर्वी गंगापुर शिवारातून टॉवर क्र . 34 मध्ये देखील चोरी केल्याचे कबुल करुन चोरी केलेली वायर अर्शद शहा भिकन शहा फकीर रा . बागवान गल्ली नंदुरबार यास विकल्याचे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार अर्शद शहा भिकन शहा फकीर याचे भंगार दुकानाची झडती घेतली असता त्याचे दुकानात 49 हजार 200 किमंतीची 98.400 किलोग्रॅम वजनाची तांबे धातुची वायर मिळुन आली . त्यास त्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरची वायर ही 10 ते 12 दिवसांपूर्वी शनिमांडळ येथील लोकांकडून विकत घेतल्याचे कबुल केले . त्यामुळे वरील 5 आरोपी , व चोरीचा माल विकत घेणारा भंगार विक्रेता अशा एकूण 6 आरोपींना दि. 1 मार्च 2022 रोजी सांयकाळी अटक करण्यात आली आहे . सदर आरोपींकडून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गुरनं 78/2022 भादवि कलम 379 व 79/2022 भादवि कलम 379 असे 2 गुन्हे उघडकीस आले असुन अटक आरोपी हे चोरी करण्यासाठी महागड्या व हायस्पीड मोटर सायकली वापरतात . त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेल्या । केटीएम , 3 बजाज पल्सर अशा एकूण 4 मोटरसायकली , 5 मोबाईल हॅन्डसेट , चोरी केलेली केबल वायर असा एकूण 5 लाख 36 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . सर्व आरोपींना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे .  सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , पोहवा प्रमोद सोनवणे , पोना राकेश मोरे , पोलीस अंमलदार अभय राजपुत , आनंदा मराठे , शोएब शेख , चापोना रमेश साळुंखे यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी संपुर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अपघाताचा बनाव, परंतु निघाला खुन,स्थानिक गुन्हे शाखेने केला गुन्हा उघड

Next Post

आंदोलनाला यश : सुसरी धरण वळण रस्त्यावर शेतकऱ्यांचा रस्ता दुरूस्तीसाठी केला चक्का जाम, संबंधित विभागाकडून दखल रस्ता दुरूस्तीला सुरुवात

Next Post
आंदोलनाला यश : सुसरी धरण वळण रस्त्यावर  शेतकऱ्यांचा रस्ता दुरूस्तीसाठी केला चक्का जाम, संबंधित विभागाकडून दखल रस्ता दुरूस्तीला सुरुवात

आंदोलनाला यश : सुसरी धरण वळण रस्त्यावर शेतकऱ्यांचा रस्ता दुरूस्तीसाठी केला चक्का जाम, संबंधित विभागाकडून दखल रस्ता दुरूस्तीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add