नंदूरबार l प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार देशद्रोही दाऊद इब्राहिम विचारसरणीला पाठीशी घालत असल्याने याच्या निषेध म्हणून आज रोजी दाऊद इब्राहिम याच्या पुतळ्याचे दहन व महाभ्रष्ट मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणी संदर्भात भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात (जुनी नगरपालिका) आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, सहकार आघाडी सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बागुल, शिक्षक आघाडी सेल जिल्हाध्यक्ष प्रा.बी.डी.पाटील, प्रज्ञा सेल जिल्हाध्यक्ष सौ.रजनी रघुवंशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र लाहोटी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, पहिला मोर्चा तळोदा तालुकाध्यक्ष प्रतिभा पाटील, आदिवासी मोर्चा शहर अध्यक्ष विजय नाईक, युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश चौधरी, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष मनिष चौधरी, किसान मोर्चा जिल्हा सचिव शरद जाधव, शहर उपाध्यक्ष राजेंद्र सोनार, सागर चौधरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य अशोक चौधरी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








