Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात भाजपातर्फे आज अंडरवर्ल्ड डॉनच्या करण्यात येणार पुतळा दहन : जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

team by team
February 28, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यात भाजपातर्फे आज अंडरवर्ल्ड डॉनच्या करण्यात येणार पुतळा दहन : जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शहादा,तळोदा, अक्कलकुवा,धडगाव,
नवापूर यासह नंदुरबार शहरात जुन्या नगरपालिकेजवळील चौकात छत्रपती शिवाजी महाराज अर्धपुतळा समोर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतऴ्याचे दहन करून देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांना पाठीशी घालणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करण्यात येणार आहे.त्याचबरोबर मुंबईत सिरीयल बॉम्बस्फोट घडवून भारत देशाशी छुपे युद्ध पुकारणाऱ्या देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या टोळीतील हस्तकांशी संबंध प्रस्थापित करणारे मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत तरी सर्व पदाधिकारी,तालुका व शहरातील कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्याा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचेेे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे.
आवाहन करताना विजय चौधरी यांनी म्हटले आहे की, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकारातील गुन्हेगार सरदार शहावली खान व कुख्यात दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकरचा हस्तक मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल कडून करोडो रुपयांच्या मोक्याच्या जागेची कवडीमोल दराने खरेदी केली होती.मंत्री नवाब मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी आर्थिक संबंध असल्याचा हल्लाबोल करीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी चार मालमत्तेची प्रकरणे ईडी कडे चौकशीसाठी दिले होते.तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडेही ते पुरावे दिले होते.हे सर्व पाहता महाविकास आघाडी सरकारने ताबडतोब त्यांचा राजीनामाा घेणे अपेक्षित होते परंतु त्या उलट त्यांना पाठीशी घालून देशाात आणि राज्यात जो गैरप्रकार कधी घडला नाही तो जाहीरपणे घडवण्याात आला.हे प्रकरण अतिशय गंभीर असून याचा निषेध करतो. नवाब मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना बरखास्त करावे;अशीही मागणी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.नवाब मलिकांनी देशद्रोह्यांना बॉम्बस्फोटातील आरोपींना कोणते असे सहकार्य केले की, ज्यामुळे या आरोपींनी मंत्री नवाब मलिक यांना कवडीमोल किमतीत जमिनी दिल्या;याची देखील चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हद्दपारीचे आदेश असतानाही नंदूरबार शहरात फिरणाऱ्या एकास अटक

Next Post

ओम शांती परिवारातर्फे आजपासून भव्य बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा

Next Post
ओम शांती परिवारातर्फे आजपासून भव्य बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा

ओम शांती परिवारातर्फे आजपासून भव्य बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add