नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषदेच्या क्रीडा उत्सवातंर्गत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी ,कर्मचारी यांच्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी आयोजित मैदानी विविध खेळांच्या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार ,ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, माध्यमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, डॉ. युनूस पठाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत २७ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मैदानी खेळांमध्ये जिल्हा परिषद मुख्यालय व सहा तालुक्यांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या त्यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो ,बुद्धिबळ, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, १०० मीटर ४०० मीटर ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. व २७ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद मुख्यालय येथे घेण्यात येऊन स्पधेतील विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात येणार आहेत.सदर मैदानी खेळ खेळल्याने कर्मचा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.








