Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 89 हजार बालकांना देणार पोलिओ डोस

team by team
February 25, 2022
in आरोग्य
0
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 89 हजार बालकांना देणार पोलिओ डोस

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय पोलिओ निमुर्लन कार्यक्रमातंर्गत रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी नंदूरबार जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजीत करण्यात आली आहे. या मोहिमेची जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तयारी करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासुन वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी लागणारी बायोव्हलेंन्ट पोलिओ लस २ लाख 61 हजार प्राप्त झाली आहे. शितसाखळी अबाधित ठेऊन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना लस पोहोचविण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 1 लाख 89 हजार 162 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. मोहिमेसाठी २ हजार 2 लसीकरण केंद्राचे नियोजन केले असून प्रत्यक्ष बुथवर डोस देणे, बालकांना बोलावुन आणणे यासाठी 4 हजार 853 कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

या मोहिमेचे 502 अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत पर्यवेक्षण केले जाणार असून जिल्ह्यातील ६ तालुक्यांचे पर्यवेक्षणासाठी स्वंतत्र 6 अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत महत्वाचे बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, चेक पोस्ट या ठिकाणासाठी 66 ट्रान्झीट टिमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भटके कामगार, विटभट्टी, उसतोड कामगार, रोड कामगार यांचे बालकांना पोलिओ देण्यासाठी ८७ मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयातंर्गत 162 वैद्यकीय अधिकारी यांनी मोहिमेचे नियोजन केले आहे.

या मोहिमेची नागरीकांना माहिती होण्यासाठी गावात दवंडी देणे, प्राथमिक केंद्राच्या वाहनावरुन कार्यक्षेत्रात प्रचार करण्यात येणार आहे. गावातील ग्रामपंचायत, शाळा, सहकारी सोसायटी यांचे फलकावर मोहिमेची ठळक प्रसिध्दी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी असणाऱ्या उद्घोषणा केंद्रावरुन बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ डोस घेण्यासाठी लाभार्थी लसीकरण स्लिप वाटप करण्यात आले असून या मोहिमेत जिल्ह्यातील नागरीकांनी सक्रिय सहभाग देवुन पाच वर्षांच्या आतील प्रत्येक बालकास पोलिओ डोस पाजुन घेण्याचे आवाहन पल्स पोलिओ समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री. सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ.गोविंद चौधरी, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ संजीव वळवी , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नारायण बावा यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

युक्रेनमध्ये अडकले नंदूरबार जिल्ह्यातील नऊ विद्यार्थी, नातेवाईकांनी केला जिल्हा प्रशासनाशी संपर्क

Next Post

नंदुरबार आगारातून धुळे, नाशिक, जळगावसाठी एसटी बस सुरू

Next Post
नंदुरबार आगारातून धुळे, नाशिक, जळगावसाठी एसटी बस सुरू

नंदुरबार आगारातून धुळे, नाशिक, जळगावसाठी एसटी बस सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add