Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिमोगा येथील हत्त्येचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

team by team
February 23, 2022
in क्राईम
0
शिमोगा येथील हत्त्येचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे, या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे. अशी आमची स्पष्ट धारणा आहे. पॉंपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केलेले आहे, त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे. भारतात घडलेल्या १९४६ च्या डायरेक्ट ऍक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसावी अशी शिक्षा व्हावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद या निवेदनाव्दारे मागणी करीत आहे.
सिमीचेच दुसरे रुप असलेल्या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालावी आणि त्यांचा पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे. कायदा कायद्याचे काम करेलच, परंतु यांना पाठीशी घालणार्‍या राजकीय नेतृत्वाने याचा गांभिर्याने विचार करुन सुधरावे, ही अपेक्षा आम्ही यानिमित्ताने करतो आहोत. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांचे पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेले आहेत. त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशिर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल. असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे करण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हामंत्री विजयराव सोनवणे, जिल्हा सहमंत्री अजय कासार, जिल्हा संयोजक अमोल पाठक, शहराध्यक्ष दिलीप बोरसे, शहर मंत्री महेंद्र सोनी, बजरंगदल संयोजक गोपाल बोनकर, पंडीराव बोरसे, रामुभाई सोनार, कपिल अग्रवाल, कोमल शर्मा, छोटूनाना कलाल, ललित पाटील, राहुल माळी, अक्षय भावसार, महेश सोनी, सनी चौधरी आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार शहरात दोन गटात सशस्त्र हाणामारी, वाहनाची मोठया प्रमाणात तोडफोड

Next Post

नवापुर पोलीस ठाण्यात महिला विश्राम गृहाचे उद्घाटन

Next Post
नवापुर पोलीस ठाण्यात महिला विश्राम गृहाचे उद्घाटन

नवापुर पोलीस ठाण्यात महिला विश्राम गृहाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add