Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैधरित्या दारुविक्री करणार्‍या इसमास न्यायालयाने ठोठावली ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

team by team
February 22, 2022
in क्राईम
0
महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

नंदुरबार | प्रतिनिधी

तळोदा पोलीस स्टेशन हद्दीतील सिलींगपुर ता . तळोदा जि.नंदुरबार येथे अवैधरित्या दारुविक्री करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ३ वर्ष सश्रम कारावास व रुपये २५ हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोनि पंडीत सोनवणे व पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की , सिलींगपुर गावातील दिपक फत्तु पाडवी हा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे आडोश्याला गावठी हात भटटीची दारू कब्जात बाळगून चोरटी विक्री करीत आहे . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि पंडीत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोना विनोद नाईक यांनी पोलीस स्टाफसह आरोपी जेथे मातीचे माठ मध्ये गावटी हात भटटीची दारु घेवुन विक्रीकरीत दिपक फत्तु पाडवी रा.सिलींगपुर ता . तळोदा यास जागीच पकडले होते . छापा केला त्यावेळेस त्याच्या ताब्यातुन १० लिटर गावठी हात भटटीची दारू जप्त करण्यात आली होती . सदर जप्त केलेल्या गावठी हात भटटीची दारुचा पंचनामा करून रासायनिक विश्लेषणाकरीता दारुचा नमुना काढण्यात आला होता . याप्रकरणी दिपक फत्तु पाडवी याच्या विरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पो . ना . विनोद नाईक , तळोदा पोलीस ठाणे यांनी करून आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते . सदर खटल्याची सुनावणी एस . डी . हरगुडे , जे.एम.एफ.सी. न्यायाधीश तळोदा यांच्या कोर्टात होवुन आरोपी दिपक फत्तु पाडवी रा . सिलींगपुर ता . तळोदा याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने सदर आरोपीस ३ वर्ष सश्रम कारावास व रुपये २५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड . एम . आय . मन्सुरी यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोहेकों देविदास वाडीले यांनी कामकाज केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

Next Post

जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘जाहिरनामा अभिमान’ अभियान, विद्यार्थी सबलीकरण उपाययोजना, रोजगाराच्या संकल्पना मांडणार

Next Post
जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या ‘जाहिरनामा अभिमान’ अभियान, विद्यार्थी सबलीकरण उपाययोजना, रोजगाराच्या संकल्पना मांडणार

जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या 'जाहिरनामा अभिमान' अभियान, विद्यार्थी सबलीकरण उपाययोजना, रोजगाराच्या संकल्पना मांडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add