नंदूरबार l प्रतिनिधी
धडगांव वडफळया रोषमाळ – बु नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवसेनेचे धनसिंग दादला पावरा यांची नगराध्यक्षपदी तर राजेंद्र गुलाबसिंग पावरा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
धडगांव वडफळया रोषमाळ – बु नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान दि.21 डिसेंबर रोजी झाले तर मतमोजणी दि . 19 जानेवारी 2022 रोजी पार पडली आहे.यात शिवसेना १३, काँग्रेस ३ तर भाजपा १ जागेवर विजयी झाले.धडगांव वडफळया रोषमाळ – बु नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार असेल याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून होते. शिवसेनेतर्फे प्रभाग क्र.१२ मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार धनसिंग दादला पावरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.धडगांव वडफळया – रोषमाळ बुनगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची आज दि.20 फेब्रुवारी रोजी दुपारी विशेष सभेचे नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.त्यामुळे धडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी धनसिंग दादला पावरा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपनगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक.6 मधील शिवसेनेचे विजयी उमेदवार राजेंद्र गुलाबसिंग पावरा यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी
विशेष सभेचे पिठासिन अधिकारी म्हणून शहाद्याचे प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी काम पाहिले.