Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डोळस तरुणीचा अंध युवकाशी विवाह म्हणाली “माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन”

team by team
February 20, 2022
in सामाजिक
0
डोळस तरुणीचा अंध युवकाशी विवाह म्हणाली “माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन”

नंदुरबार l प्रतिनिधी
डोळस तरुणीने एका अंध तरुणाशी लगीनगाठ बांधून समाजापुढे एक आदर्श उभा केल्याचे नुकत्याच पार पडलेल्या विवाह सोहळ्यातून पहायला मिळाले. तीन दृष्टिहीन भावाबहिणींपैकी दोघा भावांशी डोळस मुलींनी विवाह केल्याने हा विवाहसोहळा विशेष चर्चेत आला. नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीला मध्यप्रदेश राज्यात पानसेमल तालुक्यातील मलफा टेम्बली येथे हा सोहळा पार पडला.
नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीला वेश असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल तालुक्यात खेतीया गावापासून जवळच असलेल्या आदर्श गाव टेमली येथे शनिवारी एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. सामान्य (दृष्टीहीन नसलेल्या) वधूने एका अंध वराशी लग्न केले. दोन्ही परिवारांच्या संमतीने हा विवाहसोहळा पार पडला.


टेमली येथील रहिवासी सौ. किरण व आनंदा भीमराव मोहने यांना दोन मुले व एक मुलगी असे तीन अपत्ये असून, तिनही दृष्टिहीन आहेत. या सर्वांचे पालन पोषण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे अशक्य काम मोहने परिवाराच्या नशिबी आले. मात्र दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना शासकीय नोकरी मिळवून देण्यात हे दाम्पत्य यशस्वी झाले. या मुलांनी धुळे, मुंबई, पुणे, अमरावती अश्या विविध ठिकाणी असलेल्या दृष्टीहीनांसाठीच्या शाळांमधून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शासनाच्या दिव्यांग कोट्यातून त्यांना ‘नोकरी’ तर मिळाली पण आयुष्यभरासाठी सोबती म्हणून ‘छोकरी’ समाज त्यांना देईल का ? हा प्रश्न गंभीर होता. इथे कित्येक डोळस मुलांना लग्नाविनाच रहावे लागत असल्याची उदाहरणे समोर आहेत. मात्र, या दृष्टिहीन मुलांशी संसारगाठ बांधण्यासाठी मुली पुढे आल्या.

शनिवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्यानंतर वरखेडी ता. जि. धुळे येथिल रहिवासी सौ. संगीता व ज्ञानेश्वर अर्जुन खळाले यांची कन्या वधू गायत्रीने सांगितले की, ” अंध असल्यामुळे काहीही होत नाही. व्यक्तीचे हृदय शुद्ध असावे. प्रवीणशी बोलल्यानंतर तो आयुष्यभर आपल्यासोबत असेल असे वाटले. त्यामुळे मी घरच्यांना लग्नासाठी संमती दिली. लग्नानंतर आम्ही दोघे नेहमी आनंदी राहू. मी त्यांना आयुष्यभर साथ देईन, माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन,” असेही ती म्हणाली.

या विवाह सोहळ्यातील वर प्रवीण हा मध्य रेल्वेच्या खलाशी म्हणून कार्यरत आहे. तर प्रवीणचा मोठा भाऊ सुरेश याचाही विवाह अमरावती येथे १० जानेवारी रोजी बैतूल येथील उर्मिला या सामान्य मुलीशी पार पडला. सुरेश शहादा येथे आयडीबीआय बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्यांना एक दृष्टिहीन बहीण आहे, ती शिक्षण घेत आहे. शनिवारी पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला मोहने कुटुंबियांच्या आप्तेष्टांसह समाजातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते. आपल्या दृष्टिहीन मित्राच्या या आनंद सोहळ्यात त्याचे अनेक दृष्टिहीन मित्रदेखील बँडच्या तालावर थिरकत सहभागी झाले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवजयंतीनिमित्त विनापरवानगी मिरवणुक काढल्याप्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे धनसिंग पावरा तर उपाध्यक्षपदी राजेंद्र पावरा यांची बिनविरोध निवड

Next Post
धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी धनसिंग दादला पावरा यांचा एकमेव अर्ज दाखल, निवडीची औपचारिकता बाकी

धडगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे धनसिंग पावरा तर उपाध्यक्षपदी राजेंद्र पावरा यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add