म्हसावद प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “शिवप्रतिमा पूजन “चा कार्यक्रम युवक तालुका राष्ट्रवादी कडून संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस अल्काताई जोंधळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष राष्ट्रवादी सुरेंद्र कुवर व युवक तालुका अध्यक्ष महेंद्र कुवर यांनीही प्रतिमेचे पूजन केले. तर यावेळी तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य विष्णू जोंधळे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, आदिवासी विभाग तालुका अध्यक्ष संतोष पराडके, नगरसेवक इक्बाल शेख, शहर उपाध्यक्ष रवि तिरमली, सनी बच्छाव युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू भाऊ कुवर, युवक जिल्हा सरचिटणीस जगदीश माळी, युवक जिल्हा चिटणीस तुषार समुद्रे, युवक शहर कार्याध्यक्ष शुभम कुवर युवक शहर उपाध्यक्ष विष्णू भगरे, महेंद्र अहिरे, राजवीर जगदेव, राजेंद्र अहिरे, शैलेश कोळी, रुपेश मराठे, अभिजीत मोघे, सनी जगदेव, शोहेब जकरीया, किरण भोई, ज्ञानेश्वर पाटील, मिलिंद अहिरे आदि शिवभक्त पदाधिकारी उपस्थित होते .








