Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे ग्रामपंचायतीकडून अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना ५ टक्के निधीतून लाभाचे वाटप

team by team
February 19, 2022
in राजकीय
0
उमर्दे ग्रामपंचायतीकडून अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना ५ टक्के निधीतून लाभाचे वाटप
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे शासनाच्या आदेशाप्रमाणे दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्क्े निधीतून जीवनावश्यक साहित्य दिव्यांग व्यक्तीना अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले .
शिवजयंतीचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांच्या सोयीनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली . कार्यक्रम ग्रामपंचायत उमर्दे खुर्दे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश डी . व्ही हरणे , तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर नंदुरबार व ऍड. हेमंत महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सांगितले की , दिव्यांग व्यक्तीना त्यांच्या अधिकारांची जाणीव असणे हे गरजेचे आहे . शासनाच्या दिव्यांगांसाठी काल्याणकारी योजना आहेत काही स्वयंसेवी संस्था देखील दिव्यांग हितासाठी कार्यरत असून त्या देखील दिव्यांग हिताची काळजी घेत असतात , असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले .
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना न्यायाधीश  डी . व्ही . हरणे यांनी विविध कायद्याची ओळख करून दिली . दिव्यांगांसाठी असलेल्या कायद्यांची दिव्यांगांसाठी कायद्यात विविध तरतुदी असून कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल , असे मत व्यक्त केले , तसेच न्यायधीश  आर . एन . गायकवाड यांनी द पर्सन विथ डीसॅबिलीटी ऍक्ट २०१६ या कायद्याची माहिती देवून यात विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेश करण्यात आला असून दिव्यांग बांधवांना सन्मानाची वागणूक मिळावी व सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी संरक्षण देण्यात आले असल्याची सविस्तर मार्गदर्शन केले . यावेळी ग्रामपंचायतीतर्फे गावातील एकूण १० दिव्यांग व्यक्तीना हा लाभ देण्यात आला . ग्रामपंचायतीच्या एकूण निधीतून ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव असल्याने त्यांचा लाभ दिव्यांगाना मागणीनुसार जीवनावश्यक साहित्याच्या स्वरुपात वाटप करण्यात आला . कार्यक्रमांचे सूत्रसंचलन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हा अध्यक्ष ऍड.दत्तात्रय कदमबांडे यांनी तर आभार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप बागुल यांनी केले , कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे , मंडळ अधिकारी श्री . पानपाटील , ग्रामसेवक  भरत गुले,तलाठी किरण सूर्यवंशी ,ग्रा.पं.सदस्य श्रावण पाटील, दगेसिंग राजपूत , कैलास वळवी , कर्मचारी रवींद्र साळवे , रामा मराठे यांचे सहकार्य लाभले .यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी आभार ऍड. दत्तात्रय कदमबांडे यांनी व्यक्त केले .
बातमी शेअर करा
Previous Post

ॲक्सिस बँकेतील कॅशिअरने एफडीची बनावट पावती देवून महिलेची केली पाच लाखात फसवणुक

Next Post

कोरोनाने उध्वस्त केलेल्या तरुण विधवा महिलेचा तरुणाने संसार पुन्हा फुलवला

Next Post
कोरोनाने उध्वस्त केलेल्या तरुण विधवा महिलेचा तरुणाने संसार पुन्हा फुलवला

कोरोनाने उध्वस्त केलेल्या तरुण विधवा महिलेचा तरुणाने संसार पुन्हा फुलवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add