Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ॲक्सिस बँकेतील कॅशिअरने एफडीची बनावट पावती देवून महिलेची केली पाच लाखात फसवणुक

team by team
February 19, 2022
in क्राईम
0
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी
ॲक्सिस बँकेतील कॅशिअर तथा डेस्क ऑफीसरने एफडीची बनावट पावती देवून एका महिलेची पाच लाखात फसवणूक केल्याची घटना नंदुरबार येथे घडली असता ती खोटी पावती असल्याचे बँकेकडून सांगण्यात आल्याने महिलेला धक्काच बसला. ॲक्सिस बँकेतील कॅशिअरने एफडीची बनावट पावती देवून पाच लाखांची रोकड हडप करीत महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील जळका बाजार चौकात राहणारे नंदिनी मनोहर चौधरी या महिलेच्या घरी २० मार्च २०१८ रोजी नंदुरबार येथील ॲक्सिस बँकेतील डेस्क ऑफीसर दिनेश राजेंद्र सोनार हे आले यावेळी त्यांनी बँकेची एफडी तयार करून देण्यासाठी नंदिनी चौधरी या महिलेकडून पाच लाखाचा धनादेश घेतला तसेच अक्सिस बंकेची पाच लाखाची एफडी झाल्याची पावती दिनेश सोनार यांनी दिली होती. परंतु ही बाब चार वर्षानंतर एफडीची रक्कम काढण्यासाठी गेल्यानंतर उघडकीस आली आहे. नंदिनी चौधरी या महिलेने २५ मार्च २०२१ रोजी बँकेत जावून ॲक्सिस बँकेच्या एफडीची पावती डेस्क ऑफीसर राहुन दुसाने यांना दाखविले. त्यावेळी त्यांनी सदर पावती पाहिल्यानंतर ही खोटी असल्याचे सांगितले ही पावती तुम्हाला कोणी दिली, असे विचारल्यावर नंदिनी चौधरी महिलेने सांगितले की, २० मार्च २०१८ रोजी बँकेचे डेस्क ऑफीसर दिनेश राजेंद्र सोनार यांनी दिली. त्यावेळी दिनेश सोनार यांना फोन करन विचारले असता कोणाला काही सांगू नका, मी तुम्हाला भेटतो, असे सांगून भेटले असता सध्या माझ्याकडे पैसे नसून पैसे आल्यावर परत करतो. परंतु अद्यापर्यंत पैसे परत केलेले नाही. यामुळे ॲक्सिस बँकेच्या एफडीची बनावट पावती देवून नंदिनी मनोहर चौधरी या महिलेची बँकेतील तत्कालीन डेस्क ऑफीसरने पाच लाखात फसवणूक केली आहे. याबाबत निर्मलकुमार हर्षदराय सोलंकी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲक्सिस बँकेतील तत्कान डेस्क ऑफीसर तथा कॅशिअर दिनेश राजेंद्र सोनार याच्याविरूध्द भादंवि कलम ४२०, ४६८, ४१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अजून सहा दिवस वाढवले : नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेपुलाखालील वाहतूक २५ फेब्रुवारी पर्यंत राहणार बंद: रेल्वे विभागाची माहिती

Next Post

उमर्दे ग्रामपंचायतीकडून अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना ५ टक्के निधीतून लाभाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add