Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदार लता सोनवणेंचा जातीचा दाखला अवैध जातपडताळणी समितीचा निर्णय

team by team
February 19, 2022
in क्राईम
0
आमदार लता सोनवणेंचा जातीचा दाखला अवैध जातपडताळणी समितीचा निर्णय

नंदुरबार l प्रतिनिधी
चोपड्याच्या आमदार लता महारू कोळी उर्फ लता चंद्रकांत सोनवणे यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचा दाखला अवैध घोषित करण्यात आला आहे. अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना निर्गमित केलेले टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात येत असल्याचा आदेश अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिला आहे. माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग वसावे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे.व जगदीश वळवी यांच्या बाजूने ॲड. जगदीश कुवर यांनी बाजू मांडली.
आमदार सोनवणे यांनी टोकरे कोळी या अनुसूचित जमाती अपेक्षा. तपासणीचा प्रस्ताव जळगाव शहर महानगरपालिकेमार्फत निवडणूक प्रयोजनार्थ १० एप्रिल २०१९ रोजी नंदुरबार येथील अनुसूचित जनजमाती प्रमाणपत्र समितीकडे सादर केला होता. त्यांचा दावा ४ नोव्हेंबर २०२० ला समितीने विस्तृत आदेशान्वये अवैध घोषित केला होता. आमदार सोनवणे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे रिट याचिका दाखल करून समितीच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
नव्याने सादर केला होता दावा त्यावर उच्च न्यायालयाने ३ डिसेंबर २०२० ला दिलेल्या निर्णयानुसार समितीचा आदेश रद्दबातल करून आमदार सोनवणे यांना उपविभागीय अधिकारी अमळनेर (जि. जळगाव) यांच्याकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. तसेच हे प्रकरण चार महिन्यांत निकाली काढण्याचे आहे. निर्देशही न्यायालयाने समितीला दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानुसार आमदार सोनवणे यांनी नव्याने जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून ९ डिसेंबर २०२० रोजी समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी अधिकचे पुरावे प्रस्तावासोबत नव्याने सादर केले. हे पुरावे प्रथमच समितीसमोर आल्याने
त्याची सत्यता पडताळणीसाठी समितीने हे प्रकरण पोलीस दक्षता पथकाकडे सखोल चौकशीसाठी वर्ग केले होते. दक्षता पथकाने चौकशी करून २० मे २०२१ ला समितीकडे अहवाल सादर केला. त्यावर समितीने नुकताच हा निर्णय दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बिबटने झोपडीत शिरून एक शेळी व पांच कोबड्यांवर हल्ला चढवून केल्या फस्त

Next Post

नंदूरबार येथे मंगलाष्टकापूर्वी वधू-वरांच्या हस्ते शिवपुजन

Next Post
नंदूरबार येथे मंगलाष्टकापूर्वी वधू-वरांच्या हस्ते शिवपुजन

नंदूरबार येथे मंगलाष्टकापूर्वी वधू-वरांच्या हस्ते शिवपुजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add