नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर ता.नंदूरबार येथील श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक व उच माध्यमिक विद्यालयात शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन का.वि.प्र.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, प्राचार्या सौ. विद्या चव्हाण पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.