Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे जुने महादेव मंदीर परीसर विकासासाठी आमदार निधीतून ९७ लाख मंजूर

team by team
February 19, 2022
in राजकीय
0
नवापूर येथे जुने महादेव मंदीर परीसर विकासासाठी आमदार निधीतून ९७ लाख मंजूर

नवापूर l प्रतिनिधी
शहरातील जुने महादेव मंदीर परीसराला नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी ९७ लक्ष निधी मंजुर करुन दिल्या बाबतचे आदेश नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्याकडे दिला आहे. नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी अहिल्याबाई होळकर  पासून असलेले जुने महादेवाचे मंदीर प्रभाग क्र ७ मध्ये असुन या मंदीर परीसरात संरक्षण भिंत बनविणे, मंदीर परीसरात सुशोभिकरण करणे या कामासाठी आमदार शिरिषकुमार नाईक यांनी निधी मंजुर करुन दिला असुन या कामाचा शुभारंभ महादेवाची पुजा करुन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले  यावेळी नगराध्यक्षा  हेमलता,पाटील, उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया,प्रभाग ७ चा नगरसेविका अरुणा पाटील,शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील,नगरसेवक विशाल सांगळे,माजी नगरसेवक अजय पाटील,दर्शन प्रताप पाटील,विनय गावीत,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील,उद्योजक रमेश अग्रवाल,हरीष पाटील,गणेश वडनेरे,सुभाष कुंभार,उज्जला वडनेरे,मंदीराचे पुजारी तुळशीराम गुरव,दर्शन दिपक पाटील,कवि सुनिल पवार,अमित पंचाल,मनोहरलाल दलाल,शिरीष शहा, यशवंत पाटील, विनायक पाटील धाकू भोई आदी उपस्थित होते.यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या सत्कार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील व नगरसेविका अरुणा पाटील यांनी केला यानंतर आमदार नाईक यांच्या सत्कार गणेश वडनेरे यांनी शिवरायांची मुर्ती देऊन केला.या नंतर सत्कार  प्रभागाचा महिला यांनी केला यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक म्हणाले की आदिवासी विकास विभागाचे मंत्री ॲड. के सी पाडवी यांनी नवापूर तालुक्यासाठी ११ कोटीचा निधी मंजुर करुन दिला आहे यातुन ९७ लक्ष महादेवाचा मंदीर शुशोभिकरण करण्यासाठी मी देत आहे.याची निविदा नगराध्यक्षा यांनी काढुन कामाला सुरुवात करावी.महादेव मंदीराचे काम होण्यासाठी माझे मागील २ वर्षा पासुन प्रयत्न सुरु होते ते आज महादेवाचा कृपेने मंजुर झाले आहे. याचा मला विशेष आनंद होत आहे.या नंतर आमदार निधी मधुन श्री स्वामी समर्थ मंदीराला पण निधी दिला आहे.त्याचे काम ही लवकरच सुरु होणार आहे.नवापूर शहरातील प्रत्येक वार्डासाठी लाईटाची सुविधा मी केली आहे.यासाठी २ कोटी मंजुर झाले असुन या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नवापूर शहर एक सुंदर शहर बनविण्याची संकल्प आहे.ते माझे स्वप्न आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.या नंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील,गणेश वडनेरे,किरण टिभे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या नंतर मंदीराला निधी उपब्लध करुन दिल्या बद्दल मंदीराचे ट्रस्टी यांनी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या सत्कार केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिवसेनेचे प्रविण ब्राह्मणे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे शिवजयंतीच्या पाश्चभुमीवर पोलीसांनी केले पथसंचलन

Next Post

मोफत शिबिराच्या नावाखाली बोगस रुग्णांची नोंद करणार्‍या संस्थेवर कारवाई करा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add