म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे शिवजयंतीच्या पाश्चभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी म्हणून म्हसावद गावात स्थानिक पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिसांनी पथसंचलन करण्यात आले.
यावेळी पोलिस निरीक्षक निवृत्ति पवार,पोलीस, उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे यांच्यासह पोलिस कर्मचारी म्हसावद गावातील मुख्य बाजारपेठ, अहिल्याबाई चौक,कुबेर हायस्कूल परिसर,तोरणमाळ फाटा आदि ठिकाणी व गर्दी असलेल्या ठिकाणी पथ संचलन करण्यात आले.