नंदूरबार l प्रतिनिधी
देशामध्ये कोरोना पसरवला , असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने खा.डॉ. हिना गावीत यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार होते.त्यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी आंदोलन ऐवजी काँग्रेसने जमाबंदीमुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
नंदुरबार काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे . खऱ्या अर्थाने कोरोना पसरविण्याचे पाप हे मोदी सरकारनेच केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अपमानीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मांगावी, याकरीता भाजपाचे नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावीत यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार होते परंतु जिल्ह्यात जमाबंदी असल्यामुळे पोलीस प्रशासनाने विनंती केल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे खा. हिना गावित यांच्या घरासमोर होणारे आंदोलन रद्द करण्यात येऊन, हे आंदोलन काँग्रेस कार्यालयाबाहेर करण्यात आले, परंतु भविष्यात जेव्हा जमाबंदी रद्द होईल तेव्हा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी बोलताना सांगितले. यावेळी काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रामराव बोरसे, सुभाष पाटील, जिल्हा सरचिटणीस पंडीतराव पवार, किसान सेलचे अध्यक्ष अशोक पाटील, काँग्रेस सेवादल अध्यक्ष इजाज बागवान, देवाजी चौधरी, इक्बाल खाटीक , भास्कर पाटील, रोहिदास पाडवी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.