Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
February 18, 2022
in शैक्षणिक
0

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार,नवापूर व शहादा या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी 21 फेब्रुवारी 2022 पासून प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहेत.
प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार, या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. परीपुर्ण भरलेले प्रवेश अर्ज 21 मार्च 2022 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत जोडावी. दारिद्र्यरेषेच्या दाखला. विद्यार्थ्याचे पालक शासकीय,निमशासकीय सेवेत नसल्याबाबत तहसिलदार यांचे समक्ष पालकांचे प्रतिज्ञापत्र जोडावे. महिला पालक विधवा,घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे त्याचा जन्म 31 डिसेंबर,2015 ते 31 डिसेंबर 2016 या दरम्यान झालेला असावा.
अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा (ऑनलाईन) दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र जोडण्यात यावे प्रकलग्रस्त असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. तसेच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ इत्यादी आस्थापनावर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवू नये. भविष्यात लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल, यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मनरेगाअंतर्गत अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

नंदुरबार जिल्हा एम. एड् कृती समितीच्या जिल्हाध्यक्षपदी महेंद्र बैसाणे यांची निवड

Next Post
नंदुरबार जिल्हा एम. एड् कृती समितीच्या जिल्हाध्यक्षपदी महेंद्र बैसाणे यांची निवड

नंदुरबार जिल्हा एम. एड् कृती समितीच्या जिल्हाध्यक्षपदी महेंद्र बैसाणे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add