म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील रामपुर येथील शासकिय माध्यमिक आश्रमशाळा येथे एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प नंदूरबार अंतर्गत शासकीय मुलीचे वस्तिगृहाचे नूतन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, जि. प.सदस्य सुहास नाईक, हेमलता शितोळे, मकराजी आरीफ, पंचायत समिती उपसभापती वैशाली पाटील, प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष दिलीप नाईक,काँग्रसचे कार्याध्यक्ष शुभाष पाटील,काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक,पंचायत समिती अध्यक्ष सत्येन वळवी ,सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाडवी,,
जि.प.सदस्य प्रताप वसावे,धुळे नंदुरबार बैंकचे संचालक हारसिंग पावरा,जि.प.सदस्य जान्या पाडवी, जि.प.सदस्य मोहन शेवाळे, जि.प.सदस्या रोहिणी पवार,,पंचायत समिती सदस्या संगीता पाटिल,पंचायत समितीच्या उप सभापती वैशाली पाटील,डॉ.जाधव ठाकरे,सरपंच नर्मदा पावरा,नांदे चे सरपंच कांशीराम ठाकरे,सामाजिक कार्यकर्ता निलसिंग पवार,सरपंच लुका पावरा
उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, आदिवासी भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शासनाचा भर असून त्यासाठी अध्यापन पद्धतीत बदल करीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन उच्च शिक्षित व्हावे आणि गावाचा विकास घडवून आणावा. आदिवासी मुलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी जयपालसिंह मुंडा यांच्या नावाने आदिवासी विभागाचे स्वंतत्र क्रीडा धोरण ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी कायमची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्ताव सादर करावे. आदिवासी विकास विभागातील शिक्षक व रोजंदारी कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
ॲड. सीमा वळवी म्हणाल्या, नवीन वसतीगृह इमारतीमुळे विद्यार्थींनीसाठी चांगली सुविधा निर्माण होणार आहे. शिक्षण व खेळामध्ये विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार पाडवी म्हणाले की, जिल्ह्यात आदिवासी विभागाच्या आश्रमशाळाच्या इमारती खुप चांगल्या असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. रामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या या नूतन वसतीगृहाच्या इमारतीमुळे 200 विद्यार्थींनीना याचा लाभ मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या नूतन वसतीगृहाच्या इमारत बांधकामासाठी आदिवासी विभागामार्फत 5 कोटी 23 लक्ष इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे या इमारतीत तळमजल्यात अधीक्षक निवासस्थान, भोजन कक्ष, तर पहिला मजल्यावर 11 खोल्या, दुसरा मजल्यावर 11 खोल्या उभारण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप झाल्टे यांनी तर सुत्रसंचलन सहायक प्रकल्प अधिकारी एन.आर.माळी यांनी केले. कार्यक्रमाला सहायक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, संजय चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी.बागुल, आर.जे.मुसळे, व्ही.व्ही.सोनार, एस.एस.पाटील, डी.एच.माळी, एस.आर.पाटील, आर.एन.निकम, मुख्याध्यापक पी.एस.कुंभार, अधीक्षीका किरण घुले, सरपंच नर्मदा पावरा, परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








