तळोदा l प्रतिनिधी
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी वाण्याविहिर येथील पत्रकार योगेश्वर बुवा यांची नुकतीच नियुक्ती जाहिर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी नियुक्ती केल्याचे जाहीर केली आहे.यांच्या नियुक्तीबदद्ल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील,जसपाल वळवी,मंगेळ वळवी, गिरधर मोरे,प्रभू तडवी, रविंद्र गुरव, अनिल जावरे, इमरान पठाण, रविंद्र वळवी,शुभम भंसाली,इलियास शेख, हेमंत परदेशी, राजेंद्र कामे, कमलेश शिंदे तसेच तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.








