Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे पोलीसांचे कर्तव्यात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ व मारहाण करणार्‍या दोघा महिला आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

team by team
February 16, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे पोलीसांचे कर्तव्यात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ व मारहाण करणार्‍या दोघा महिला आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे जि.प.उपोषण दरम्यान तब्बेत खालावल्याने पोलीस रूग्णालयात घेवुन जात असतांना पोलीसांचे कर्तव्यात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ व मारहाण करणार्‍या महिला आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पासुन जिल्हा परिषद कर्मचारी सुरेखा आधार बोरसे ही आमरण उपोषणासाठी बसलेली होती . त्या दिवशी त्या ठिकाणी फिर्यादी महिला पोलीस अंमलदार बबिता नुरजी देसाई व कलावती वसावे अशांना डयुटी बंदोबस्त रात्री ८. वाजेपासुन लावण्यात आलेला होता . त्याचवेळेस नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोनि नितीन चव्हाण हे देखील त्यांच्या पोलीस स्टापसह हजर होते . जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री . बागुल व त्यांचे सहाय्यक श्री . पाटक व पोनि नितीन चव्हाण असे जिल्हा परीपद आवारात उपोषणकर्ती महिला सुरेखा आधार बोरसे हिस उपोषण सोडणेबाबत व तिला निलंबित केल्याचे कारण समजावून सांगत असतांना सुरेखा बोरसे हिने मी उपोषण सोडणार नाही असे सांगुन टोमणे मारत होती . सुरेखा आधार बोरसे हिची तब्बेत खालावल्याने तिला श्री . बागुल यांनी वैद्यकीय उपचार घेण्याबाबत विनंती केली असता,तिने उपचारास देखील नकार दिला होता . सिव्हील हॉस्पीटल येथील वैद्यकीय अधिकारी यांना जागेवरच बोलावुन सुरेखा हिस तपासले असता डॉक्टरांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याबाबत तेथे उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना सल्ला दिला होता . उपोषण सोडण्यास व रुग्णालयात दाखल होण्यास सुरेखा हिने नकार दिल्याने तिला उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बळाचा वापर करीत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता , त्याच वेळेस सुरेखा आधार बोरसे हिची मुलगी हर्षदा सुधीर पाटील व आई कोकीळा आधार बोरसे यांनी पोलीसांना मज्जाव करत पोनि चव्हाण यांच्या अंगावर मारण्याच्या उद्देशाने धावत येवुन वाईट वाईट शिवीगाळ केली होती . तसेच हर्षदा पाटील हिने मोबाईल मध्य पोलीसांची व्हीडीओ शुटींग करत खोटया तक्रारी करण्याच्या धमक्या दिल्या होत्या . नंतर हर्षदा पाटील व कोकीळा बोरसे यांना ताब्यात घेवून पोलीस गाडीत बसवितांना हर्षदा पाटील हिने फिर्यादी महिला पोलीस अंमलदार बबिता नुरजी देसाई यांना वाईट वाईट शिवीगाळ करत चापटीने मारुन , उजव्या हातास चावा घेत ९ ते १० गोळया घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता . वैद्यकीय अधिकारी यांनी उपोषणकर्ती आरोपी महिला सुरेखा आधार बोरसे हिची प्रकृती अधिक खालावु शकते असे पत्र दिल्याने तिला बळाचा वापर करत शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारकामी दाखल केले होते . अश्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वरील तिनही महिला आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर खटल्याची सुनावणी अति . जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार आशुतोष भागवत यांचे कोर्टात होवुन आरोपी सुरेखा आधार बोरसे, हर्षदा सुधीर पाटील,कोकीळा आधार बोरसे सर्व रा.वावद ता . जि . नंदुरबार यांच्याविरुद गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने भा.द.वि.क. ३५३,३५ ९ , ३४ अन्वये सुरेखा बोरसे हिस ६ महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड, कोकीळा बोरसे हिस १ महिना कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे . हर्षदा सुधीर पाटील हिची शिक्षा जिल्हा परीविक्षा अधिकारी यांच्या कार्यालयातुन अहवाल सादर केल्यानंतर ठोठावण्यात येणार आहे . वरील गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र तत्कालीन पोलीस निरीक्षक एस . आर . मथुरे यांनी सादर केले होते . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील ऍड . वी . यु . पाटील यांनी पाहिले.सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन साळवे व पोना गिरीश पाटील यांनी कामकाज केले.

बातमी शेअर करा
Previous Post

विसरवाडी पोलिसांचा पानबारा आश्रम शाळेकडून सत्कार

Next Post

मांजरे येथे खा.हिना गावीत व डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचा कामाचा शुभारंभ

Next Post
मांजरे येथे खा.हिना गावीत व  डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचा कामाचा शुभारंभ

मांजरे येथे खा.हिना गावीत व डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचा कामाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add