Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांनी दिली देहली प्रकल्पास भेट, जाणून घेतल्या प्रकल्पग्रस्ताच्या समस्या

team by team
February 14, 2022
in राजकीय
0
पालकमंत्र्यांनी दिली देहली प्रकल्पास भेट, जाणून घेतल्या प्रकल्पग्रस्ताच्या समस्या

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी आज अक्कलकुवा तालुक्यातील देहली येथील प्रकल्पाला भेट दिली व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, प्रताप पाडवी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, अधिक्षक अभियंता सु,स,खांडेकर, कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, तहसिलदार सचिन म्हस्के, उपअभियंता किशोर पावरा, कनिष्ठ अभियंता विकास शिंदे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे, सरपंच बबलु पाडवी, चंदु पाडवी, ईश्वर तडवी आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड. पाडवी म्हणाले की, मी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे आलो असून आपल्या समस्या निश्चित सोडविल्या जातील असे त्यांनी सांगितले. आदिवासी विभागाने भूमिहिन दारिद्ररेषेखालील आदिवासींसाठी सबळीकरण व स्वाभिमान या योजनेअंतर्गत 4 एकरापर्यत जिरायती जमीन रू.5 लाख प्रति एकर या कमाल मर्यादित दराने व 2 एकरापर्यत बागायती जमिन रू.8 लाख प्रति एकर या कमाल मर्यादित दराने देण्याची दरतूद आहे. त्यानुसार 102 प्रकल्पग्रस्तांसाठी 163.20 हेक्टर जमीनीकरिता अंदाजित एकूण 8 कोटी 18 लाख 28 हजार 480 रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या भागातील रस्ते, शाळा, पाणीपुरवठा योजना, ग्रमापंचायत इमारत बांधकाम, स्मशानभूमी, समाजमंदिर, तसेच सांस्कृतिक भवनासाठी तसेच या भागातील विविध विकासकामांसाठी आदिवासी विभाग व जिल्हा नियोजन समितीमार्फत निधीची तरतुद करण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या सागाच्या घरांना घसारानुसार रक्कम देण्यात येईल. ज्या लोकांच्या प्रकल्पासाठी जमिनी गेल्या आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांना मच्छीमार सोसायटी स्थापन करण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल तसेच त्यांना मत्स्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.तसेच प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.
यावेळी लोकसंघर्ष मोर्च्याच्या प्रतिभाताई शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांना सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ मिळावा, भूमिहीन जमीन, घरकुल, मनरेगा, शेळीपालन, इत्यादी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची मागणी केली.
प्रास्ताविकात श्री.चिनावलकर यांनी देहली प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी आंबाबारी, रायसिंगपूरा, दसरापादर, रतनबारा, रांझणी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक व लोकसंघर्ष मोर्च्याचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा येथील ऑक्सीजन प्लॅन्टचे उद्घाटन

Next Post

विश्वविक्रमी योग प्रशिक्षक योगिनी डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या उपस्थितीत जळखे आश्रमशाळेत व्हॅलेंटाईन डे वॅलेन्टाईन डे ऐवजी करण्यात आले माता-पिता पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add