म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील फेस येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय याठिकाणी दोन दिवसीय स्काऊट-गाईड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरचे स्काऊट शिक्षक नरेंद्र गुरव यांनी केले.त्यानी आपल्या मनोगत सांगितले की, स्काऊट गाईड चळवळी विषयी माहिती तसेच मनोरंजनात्मक गाणी व खेळ व सामाजिक जीवनातील स्काऊट गाईड चे महत्त्व काय असते ते विद्यार्थ्यांना सांगितले . यावेळी अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक के.एल.पाटील होते.स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन श्री.ठाकूर यांनी केले व के.बी.पाटील यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी शिबिराचा समारोप नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व अर्थ सभापती अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी गावातील प्रतिष्ठित शेतकरी वेडु चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. अभिजीत पाटील यांनी तंबूचे निरीक्षण तसेच अन्नकोट( थाळी सजावट) यांचे निरीक्षण करीत विद्यार्थ्यांचं कौतुक केले. दोन दिवसीय स्काऊट-गाईड शिबीरासाठी श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाचे जयेश पाटील, हेमंत कोते यांनी परिश्रम घेतले.








