तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथे मार्च एन्ड पूर्वी पालिकेने थकबाकी वसुलीवर भर दिला आहे. कर भरण्यास मालमत्ताधारक कर वसुली देण्यास अनाकाणी करत आहेत. पालिकेने अश्या थकबाकीदारांकडे दाराबाहेर पालिका वसुली पथक ढोल-ताशे वाजवून वसुलीचा फंडा वापरत आहेत.
सर्वात जुनी पालिका असून मालमत्ता व इतर करांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढल्याने मार्च एन्ड पूर्वी पालिकेने थकबाकी वसुलीवर भर दिला आहे. कर भरण्यास मालमत्ताधारक कर वसुली देण्यास अनाकाणी करत आहेत. पालिकेने अश्या थकबाकीदारांकडे दाराबाहेर पालिका वसुली पथक ढोल-ताशे वाजवून वसुलीचा फंडा वापरत आहेत. या अनोख्या वसुलीची चर्चा रंगली आहे. तरी थकबाकीदारांनी मालमत्ता कर व पाणी पट्टी कराची थकबाकी भरावी असे आवाहन पालिका मुख्यधिकारी यांनी केले आहे. तळोदा नगरपालिकेतर्फे कर वसुलीसाठी कार्यालय अधीक्षक राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक आश्विन परदेशी, वसुली लिपिक अनिल माळी, मोहन माळी, दिगंबर माळी, तसेच कर्मचारी. नितिन शिरसाठ, गोरख जाधव, सुनील माळी, भटू चौधरी, अजय वाघ, छोटू चौधरी आदी पथक कर वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत.








