Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोलवीमाल गावाचा पोलीस ठाण्याचा कार्यभार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वर्ग करा, ॲड.रुपसिंग वसावे यांचे मेहबूब शेख यांना निवेदन

team by team
February 12, 2022
in राजकीय
0
कोलवीमाल गावाचा पोलीस ठाण्याचा कार्यभार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वर्ग करा, ॲड.रुपसिंग वसावे यांचे मेहबूब शेख यांना निवेदन

अक्कलकुवा । प्रतिनिधी
कोलवीमाल हे गाव अक्कलकुवा या तालुक्याच्या ठिकाणापासून १३ किमी अंतरावर आहे. मात्र, सदर गावाच्या पोलीस ठाण्याचा समावेश गावापासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या मोलगी परिक्षेत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना कायदेविषयक कामकाजाकरिता मोलगी गाठावे लागते. त्यात नागरिकांची गैरसोय होतेच शिवाय वेळ, श्रम व पैसा या तिन्ही गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी सदर गावाचा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात समावेश करावा. जेणेकरून जनसामान्यांना सोयीचे होईल, अश्या मागणीचे निवेदन ॲड. रुपसिंग वसावे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाल या गावाचा पोलीस ठाण्याचा कारभार मोलगी पोलीस ठाण्यात असून तो अक्कलकुवा येथे वर्ग करण्याची आवश्यकता व गरज का आहे? हे निदर्शनास आणून दिले आहे. कोलवीमाल हे गाव अक्कलकुवाहून फक्त १३ कि.मी. अंतरावर असून
मोलगी हे पोलीस ठाणे कोलवीमालहुन ७० ते ८० कि.मी. अंतरावर आहे. शिवाय कोलवीमाल येथील काही वस्तीपाड्यांमध्ये अद्यापही रस्त्याची सुविधा नसल्याने एखाद्या गावात काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मोलगी पोलीस ठाणे हे गावाहून मोठ्या अंतरावर असल्याने पोलीस प्रशासनास वेळेवर माहिती देता येऊ शकत नाही. मोलगी हे गावदेखील दुर्गम भागात असल्याकारणाने व बऱ्याच वेळा रेंजचा प्रश्न निर्माण झाल्याने फोनवरदेखील पोलीस ठाण्यात संपर्क होऊ शकत नाही. मोलगी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी अक्कलकुवा व्हाया मोलगीला तक्रार अथवा खबर देण्यासाठी लोकांना वेळेवर वाहन उपलब्ध न झाल्यास तक्रारदार व इतर लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. विशेषतः गावात एखाद्या व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास पोलीस ठाण्यात अपघ मृत्यू नोंद करुन मयत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठीदेखिल मोलगी ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. दुर्गम भागातील मोलगी येथे जाण्यासाठी डोंगराळ व घाट वळणाचा रस्ता असल्यामुळे एखादी खबर द्यायची झालीच तर पूर्ण दिवस हा येण्याजाण्यातच जात असतो. गावात कोणत्याही कंपनीचे टॉवर नसल्याने कोणतीही माहिती तात्काळ मोलगी पोलीस ठाण्यात पोहचविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. याउलट कोलवीमालपासून अक्कलकुवा जवळ असल्याने गावातील लोकांना कुठल्याही प्रकारच्या तक्रारी देण्यासाठी अक्कलकुवा पोलीस स्टेशन हे सोयीचे होईल. त्यामुळे लोकांचे होणारे आर्थिक नुकसानदेखील टळेल व गावात कोणत्याही प्रकारचे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास एका तासाच्या आत अक्कलकुव्याला कुठलीही तक्रार गावकरी देऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.
या अनुषंगाने कोलवीमाल ते मोलगीचे अंतर पाहता व लोकांची गैरसोय लक्षात घेता, सदर निवेदनाची गंभीरतेने दखल घेऊन कोलवीमाल गावाचा पोलीस ठाण्याचा कारभार हा मोलगी पोलीस ठाण्याहुन अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात येऊन तसे आदेश संबंधित विभागास देण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्याकडे ॲड. रुपसिंग वसावे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावर चौपदरीकरणासाठी मंजुरी, दोन महिन्यानंतर कामाला होणार सुरुवात : खा. डॉ. हिना गावीत

Next Post

पालिकेच्या अनोख्या मोहीमेची चर्चा; मालमत्ता ढोल बजावुन वसुली

Next Post
पालिकेच्या अनोख्या मोहीमेची चर्चा; मालमत्ता ढोल बजावुन वसुली

पालिकेच्या अनोख्या मोहीमेची चर्चा; मालमत्ता ढोल बजावुन वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add