नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील मौजे रायपूर, सावरट,आहवा, डोकारे ,बिलदा, खांडबारा ,खैरवे धानोरा रस्ता रा मा 9 कि मी रस्त्या ची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन श्रीफळ फोडुन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प शिक्षण सभापती अजित नाईक,भरडु गटाचे जि प सदस्य मधुकर नाईक,प्रकाश नाईक, विनोद नाईक,पं.स सदस्य दारासिंग गावीत,गौरजी गावीत,प्रभुदास गावीत,माजी पं.स सदस्य महारु गावीत,डोगेगाव गावाचे ग्रा म सदस्य प्रदिप वळवी,अजित वळवी,फत्तेसिंगी पाडवी, ॲड. प्रदिप वळवी,यशवंत गावीत,राजाराम गावीत,खांडबारा येथील योगेश भिका चौधरी,योगेश भगवान चौधरी,शैलेश गावीत,मगन वळवी,चंद्रकांत वसावे,रणजीत गावीत,सुरेश चौधरी,दिलीप जाधव, नंदुरबार येथील सा.बा.विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ.वैशाली पाटील,अभियंता संजय पाडवी, अभियंता अक्षय गावीत सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.या रस्त्याचे ३ ठिकाणी रस्त्या कामाच्या शुभारंभ आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला हा रस्ता अंदाजी 1550.0 लक्ष खर्चीक आहे. तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांच्या कामाला मंजुर मिळवुन रस्ते होत असल्याने ग्रामीण भागांमध्ये नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.








