म्हसावद l प्रतिनिधी
येथील सन्मित्र क्रीडा मंडळ शहादातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमीत्ताने व शिवछत्रपती महाराज जयंतीच्या औचित्याने शिवाजी महाराज मनामनात, शिव जयंती घराघरात या संकल्पना नुसार प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तिन गटात स्पर्धा आयोजित केली आहे.
यात गट क्रमांक 1 इ.1ली ते 3 री विषय- शिवकालीन व्यक्तींच्या विविध वेशभूषा.(सरदार, मावळे) वेळ – 1 मिनिट सादरीकरण (Vdo),
गट क्रमांक 2 इ. 4 थी ते 6 वी विषय शिवजयंतीची आकर्षक सजावट किंवा देखावा.(एक फोटो सजावटीचा ), गट क्रमांक 3 इ. 7 वी ते 9 वी
विषय नाट्यछटा स्पर्धा (शिवछत्रपती महाराज संबंधित संवाद / स्वराज्यची स्थापना ) वेळ 4 मिनिटे(Vdo) या स्पर्धा ऑनलाइन असल्याने प्रत्येक गटातील स्पर्धकांने Vdo /फोटो पाठवावा.
गट क्रमांक 1 साठी एक मिनिट, व गट क्रमांक 3 नाट्यछटेसाठी 4 मिनीटाची Vdo क्लिप करतांना,प्रत्येक गटातील स्पर्धकाने आपले पूर्ण नाव ,शाळाचे नाव, इयत्ता ,गावाचे नाव याचा स्पष्ट उल्लेख करावा.स्पर्धा शहादा शहरातील व तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. स्पर्धकाने आपले VDO व फोटो 19 फेब्रुवारी, अखेर रात्री 8 पर्यंत पोहोचवावे .प्रथम, व्दितिय, तृतीय क्रमांक विजेतांना सन्मान चिन्हं व प्रमाणपत्र देण्यात येईल.उत्तेजनार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी आपले VDO व फोटो प्रा. ज्ञानी कुलकर्णी मोबाईल नंबर 9404070899 या क्रमांकावर पाठवावे.असे आयोजक सन्मित्र क्रीडा मंडळ शहादा (नंदुरबार) यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.










