म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे प्रधामनंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन व भाजपातर्फे स्व.लतादिदी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील स्व. मा.आण्णासाहेब स्मारक चार रस्ता येथे भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा वतिने व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन नंदुरबार जिल्हा सचिव घनशाम पाठक यांनी सुत्रसंचालक सांभाळत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते स्व.लतादिदी यांच्या प्रतीमेस पुष्पमाळ अर्पण करूण भावपुर्ण श्रध्दांजली अर्पित केली व सौ.माधवी पाटील यांनी दिदींना पुष्प वाऊन श्रध्दांजली दिली व दिदींचा काही आठवणी विचार मांडल्या त्या आठवणींनी सर्व समुह भावुक झाले.कार्यक्रमाला माजी उपसरपंच लोणखेडा अशोक पाटील ,अरूण पाटील, भाजपा जिल्हा महीला सचिव संगिता पाठक,भाजपा शहादा तालुका चिटणीस बापु सोनार,भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष ईश्वर पाटील,ज्योती पाटील व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन शहादा तालुका सह मान्यवर व भाजपा शहादा तालुक्यातील मान्यवर, लोणखेडा ग्रामस्थ दत्तु पाटील,संजय पाटील,दिलीप पाटील,राजाराम पाटिल,भटू पाटील,नागराज पगारे ,अरविंद सर,दिनेश निकुंभ,आदी मान्यवरांचा उपस्थित स्व. दिदींना भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.