नंदूरबार l प्रतिनिधी
श्री.स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित परम पूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने तसेच दिंडोरी प्रणित बालसंस्कार विभागाचे मार्गदर्शक गुरुपुत्र व नितीन भाऊसाहेब मोरे यांच्या सुंदर अशा कल्पकतेने जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार येथील बालसंस्कार विभागअंतर्गत सूर्यनमस्कार घेण्यात आले.
आरोग्य चिकित्सक डॉक्टर चंद्रशेखर वसईकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर सूर्यनमस्कार प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपल्या शरीराला आवश्यक असलेले अनेक घटक व व्यायामामध्ये सूर्यनमस्कार ही अतिशय महत्त्वाची साधना आहे. सूर्यनमस्कारामुळे आपल्या शरीराला बहु आयाम मिळतोच त्याच सोबत मनाची एकाग्रता व बुद्धीचा विकास देखील होतो. बालवयापासुन सूर्य नमस्कार केल्याने शरीराला स्थिरता प्राप्त होते त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास व अध्यात्म करण्याची रुची वाढीस येते. विद्यार्थ्यांची आदर्श दिनचर्या कशी असावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले त्यात सकाळी झोपेतून उठतांना भूमी प्रार्थना, कर दर्शनाचे महत्व देऊन ती प्रार्थना म्हणून घेतली.गंगा कवच म्हणून स्नान करावे आई-वडिलांना नमस्कार करुन चरणतीर्थ घ्यावे, मंत्राचे महत्व विषद करण्यात आले.
श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार येथील बालसंस्कार प्रतिनिधींच्या उपस्थितीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून बक्षीस समारंभाने कार्यक्रमाची सांगता करत कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक कृषी व कृषी संशोधन केंद्र चौपाळे रोड नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले. त्यात एकूण 41 बालसंस्काराचे विद्यार्थी सहभागी होते.