Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खताच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फिरत्या प्रचार वाहनाचा जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी शुभारंभ

team by team
February 8, 2022
in कृषी
0
खताच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फिरत्या प्रचार वाहनाचा जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी शुभारंभ

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा परीषद कृषि विभाग व रामा कृषि रसायन यांच्यातर्फे सिंगल सूपर फॉस्फेट खताच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फिरत्या प्रचार वाहनास अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, कृषि सभापती गणेश पराडके, मुख्य कार्यकारी अधिकारी रघूनाथ गावडे, अति.मूख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर,जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एस.लाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
शेतकर्‍यांनी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर वाढवावा फॉस्फेटिक खतामध्ये डीएपी खतानंतर सिंगल सुपर फॉस्फेट हे सर्वाधिक लोकप्रिय खत आहे. तसेच एसएसपी हे देशांतर्गत तयार होत असून ह्यामध्ये फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम तसेच काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया व कांदा पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशिर ठरणार आहे. शेतकर्‍यांनी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर वाढवावा असे आवाहन अध्यक्षा ऍड.सीमा वळवी यांनी केले.तसेच कृषि सभापती पराडके यांनी सिंगल सुपर फॉस्फेट खत हे शेतकर्‍यांसाठी वरदान असल्याचे सांगितले. एसएसपी सारख्या सरल खतापासून मिश्र खताच्या ग्रेड तयार करता येतात. त्यामूळे अतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध होतात. नंदूरबार जिल्ह्यात मिरची, कांदा इ. पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. ह्या पिकांना नत्र, स्फूरद, पालाश या घटकांबरोबरच सल्फर, बोरॉन, कॅल्शियम व झिंक या दुय्यम घटकांची देखिल गरज असते. यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट खत हे अत्यंत उपयूक्त असल्याचे कृषि विकास अधिकारी पी.एस.लाटे यांनी सांगितले.यावेळी मोहिम अधिकारी महेश विसपूते, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) एल.डी.भोये, नंदुरबार पंचायत समिती कृषि अधिकारी योगेश हिवराळे, रामा कृषि रसायन कंपनीचे अधिकारी एन.एम.गौतम,हर्षल भामरे हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

राज्य क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करावे

Next Post
राज्य क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करावे

राज्य क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add