Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
February 8, 2022
in शैक्षणिक
0

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी 1 फेब्रुवारी 2022 पासून प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र पंचायत समिती तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. परीपुर्ण भरलेले प्रवेश अर्ज 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत जोडावी. दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्य प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

विद्यार्थ्याचे पालक शासकीय,निमशासकीय सेवेत नसल्याबाबत तहसिलदार यांचे समक्ष पालकांचे प्रतिज्ञापत्र जोडावे. महिला पालक विधवा,घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे त्याचा जन्म 1 ऑक्टोंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2016 या दरम्यान झालेला असावा.
अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा (ऑनलाईन) दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र जोडण्यात यावे प्रकलग्रस्त असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. तसेच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ इत्यादी आस्थापनावर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवू नये. भविष्यात लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल, यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष (तळोदा) यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोन जण जखमी

Next Post

खताच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फिरत्या प्रचार वाहनाचा जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add