नंदुरबार l प्रतिनिधी
अन्यायग्रस्त पिडीत महिलांना न्याय देता यावा व त्यांच्या समस्यांचे त्वरीत निरसन व्हावे यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर या नंदुरबार जिल्हा दौर्यावर येत आहेत.
पिडीत व अन्यायग्रस्त महिलांनी दि.१० फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृह येथे लेखी तक्रार स्वरुपात प्रत्यक्ष सादर करण्यासाठी उपस्थित रहावे. महिला आयोग आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रत्यक्ष येत आहे. याचा अन्यायग्रस्त व पिडीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा ॲड.अश्विनी जोशी यांनी केले आहे.