Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय किसान सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या, प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र

team by team
February 7, 2022
in राजकीय
0
भारतीय किसान सेनेच्या पदाधिकाऱ्यांना  नियुक्त्या, प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र

नंदुरबार l प्रतिनिधी –

भारतीय किसान सेना (सेक्युलर)पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

नंदुरबार येथे जिल्हा कार्यालयात सोमवार दि.7 फेब्रुवारी रोजी दुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवापूर तालुकाध्यक्षपदी सुनील बापू गावित,नवापूर तालुका कृषी सल्लागारपदी विपुल गावित तर धुळे जिल्हाध्यक्षपदी अंबुरपाडा ( उमरपाटा) ता. साक्री येथील देवा कुवर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी प्रदेश महासचिव पंडित तडवी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,भारतीय किसान सेना (सेक्युलर) राजकीय पक्ष असून समाजातील लोकांना एकत्रित करुन समाजाचे अधिकार, समाजसेवा आणि शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी लढा देण्याचे काम करत आहे असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित प्रदेश प्रवक्ता सुभाष नेरकर, जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, तालुका उपाध्यक्ष रविदास वळवी, शहराध्यक्ष राजू माळी, सुधाकर वसावे,रवींद्र वळवी,सुनील भिल, भास्कर तडवी,दीपक भिल,अजय भिल ,सालम गावित इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कोपर्ली येथे शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर अतिरिक्त भार काढीत वीजपुरवठा झाला सुरळीत

Next Post

महिला आयोग अध्यक्षा नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर

Next Post
महिला आयोग अध्यक्षा नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर

महिला आयोग अध्यक्षा नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add