Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिनी घेण्यात आले रक्तदान शिबिर

team by team
February 7, 2022
in शैक्षणिक
0
नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिनी घेण्यात आले रक्तदान शिबिर

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्रीमती डी.आर.हायस्कूलमध्‍ये वसंत पंचमीला नंदुरबार एज्युकेशन सोसायटी चा ८१ वा वर्धापन दिन जनकल्याण रक्तपेढीच्‍या सौजन्याने रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र सराफ तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी चेअरमन गिरीश खूंटे, सचिव प्रशांत पाठक, अशोक टेंबेकर, श्रीराम मोडक,उपप्राचार्य सुभाष चौधरी,उपमुख्‍याध्‍यापक एन.के.भदाणे,डॉ.काणे विद्यामंदीरच्‍या मुख्‍याध्‍यापीका सुलभा महिरे,विपुल दिवाण, तसेच जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील, विश्वस्त डॉ. अर्जून लालचंदानी, विजय कासार तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष शेखर कोतवाल, सचिव राहुल पाटील, आनंद रघुवंशी व लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षा हिना रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात प्रा.दिपक सोनवणे यांनी संस्थेची स्थापना १९४१ पासून आजपर्यंत संस्थेच्या भरभराटीचा आलेख मान्यवरांसमोर मांडला व आज संस्थेने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात कसे रूपांतर झाले याची माहिती मान्यवरांना दिली.
अतिथी मनोगतात शाळेचे माजी विद्यार्थी व जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील यांनीसुद्धा जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेने अनेक विद्यार्थ्यांना कसे घडवले, त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला व आजही शाळा कशी यशाच्या शिखरावर आहे. याचा ऊहापोह केला व सर्व शिक्षक व संस्थाचालक यांचा गुणगौरव केला. तसेच रक्तदान हे किती महान दान आहे प्रत्येकाने ते करणे कसे योग्य आहे ते पटवून दिले. डॉ.लालचंदानी यांनीसुद्धा रक्तदाना मागील वैज्ञानिक भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षीय मनोगतात नरेंद्र सराफ यांनी रक्तदाते तसेच जनकल्याण रक्तपेढी यांचेही आभार व्यक्त केले.तसेच लायन्स क्लबच्या वतीने शाळेला ५ ग्रीन बोर्ड संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भेट देण्यात आले. कार्यक्रमांत पाहूण्‍यांचा परिचय प्रवीण परदेशी, सत्कार यादी वाचन सीमा नाईक तर सूत्रसंचालन हेमंत बोरसे यांनी व आभार चंद्रशेखर पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करून साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

घराच्या जागेच्या वादावरून पती- पत्नीवर प्राणघातक हल्ला

Next Post

चौपाळे येथे खुनाच्या घटनेनंतर दुसऱ्या गटानेही दाखल केला पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next Post
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

चौपाळे येथे खुनाच्या घटनेनंतर दुसऱ्या गटानेही दाखल केला पाच जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add