नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कन्साई गावात घराच्या जागेच्या वादावरून पती- पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्यात पती-पत्नी जखमी झाले असून सात जणांविरध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील कन्साई येथील रहिवासी चैत्राम रामा ठाकरे व तुकाराम वेडू भिलावे या दोघांमध्ये घराच्या जागेचा वाद सुरू होता. जागेच्या वादातून चैत्राम रामा ठाकरे व त्यांची पत्नी जमुनाबाई चैत्राम ठाकरे या दोघांवर लोखंडी सळई व धार्याने डोक्यावर मारहाण करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यात चैत्राम ठाकरे व जमुनाबाई ठाकरे हे दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले. चैत्राम रामा ठाकरे यांच्या फिर्यादीवरून तुकाराम वेडू भिलावे, विष्णु तुकाराम भिलावे, दशरथ तुकाराम भिलावे, योगेश तुकाराम भिलावे, कांतीलाल तुकाराम भिलावे, भाऊसिंग भाईदास भिलावे, चंद्रकलाबाई तुकाराम भिलावे सर्व रा.कन्साई ता.शहादा यांच्याविरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्त पवार करीत आहेत.